नगरसेवक सुदामभाऊ शेवकरी यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रं १३ मधील विविध कामांचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

चाकण : चाकण नगरपरिषदेच्या हद्दीतील नगरसेवक सुदामभाऊ शेवकरी यांच्या प्रयत्नातून प्रभाग १३ मध्ये अंदाजे ४५ लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन खेड तालुक्याचे कार्यक्रम सम्राट आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी प्रभाग क्रमांक १३ मधील सुदर्शन साईट्स ते पुणे नाशिक हायवे बंदिस्त ड्रेनेज लाईन करणे,शिव रेसीडेंसी ते रो हाऊस पर्यत रस्ता डांबरीकरण करणे, बाळकृष्ण नगर ते चिंचेचा रस्ता डांबरीकरण करणे,आंबेठाण रोड ते शेवकरी वाडा पेव्हिंग ब्लाँक बसवणे,चिंचेचा रस्ता ते पुन्हा नाशिक हायवे पर्यंत पाईप लाईन करणे, सतिश शेवकरी यांचे घर ते सुदर्शन हाईट (चिंचेचा रस्ता) स्ट्रिट लाईट पोल बसविणे,साई पडाळ ते साई सामल करिता पाईप लाईन टाकणे,शिवम रेसी ते शिवम रो हाऊस पर्यंत पाण्याची पाईप लाईन टाकणे इत्यादी कामांचे भूमिपूजन करण्यात आले

यावेळी चिंचेचा रस्ता या ठिकाणी गटार लाईनचे भूमिपुजन केले तसेच याठिकाणीच्या रस्ताचे सुध्दा लवकरात लवकर काम मार्गी लावण्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील या़ंनी आश्वासन दिले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राम गोरे, चाकण नगरसेवक प्रकाश भुजबळ, स्विकृत नगरसेवक विशाल नायकवडी, किरण कौठकर, सुदामभाऊ शेवकरी, विकास नाईकवाडी, व्यंकटेश सोरटे(तात्या), कैलास गवई, मोहन वाबळे, प्रल्हाद शेवकरी, गणेश कड, गुलाब शेवकरी, मिलिंद शेवकरी, घोडेकर गुरुजी, समता परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षा शोभाताई शेवकरी, वाकी ग्रामपंचायत सदस्य मंगलाताई जाधव, चाकण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा निताताई शहा, सामाजिक कार्यकर्ते हिराबाई शेवकरी आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleसमाजातील वंचित घटकांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा- गटविकास अधिकारी सुधीर भागवत
Next articleयापुढील काळात लोणीकंद पोलिस ठाण्यातील कामकाजात राजकीय हस्तक्षेप व मिलीभगत चालणार नाही – पोलिस उपायुक्त पंकज देशमुख