मंचर मध्ये नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

प्रमोद दांगट, प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या मंचर येथे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोरोनाचे संसर्ग वाढू नये म्हणून मा.जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार तालुक्यातील मंचर शहर,केंद्रस्थानी धरून त्याच्या जवळपासचा पाच किलोमीटरचे क्षेत्र हे प्रशासनाने बंफर क्षेत्र जाहीर केले आहे .या क्षेत्रात विनापरवाना फिरणे ,गर्दी जमवणे,दुकाने उघडी ठेवणे या साठी बंदी असतानाही मंचर येथील काही दुकानदारांनी आपली दुकाने उघडून दुकानासमोर ग्राहकांची गर्दी होईल असे वर्तन केले तसेच कोरोना या संसर्गाचा प्रसार होईल असे वर्तन केल्याने चार दुकानदारांवर मंचर पोलिसांनी कारवाई केली आहे

आंबेगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असून कोरोनाचा प्रसार वाढू नहे म्हणून प्रशासनाने तात्काळ कोरोना रुग्ण सापडलेल्या गावात विविध उपाययोजना राबविल्या आहेत कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून मंचर शहर व परिसरात कुणीही बाहेर पडू नये किंवा बाहेर कोणीही गावात येऊन संचार बंदीचे उल्लंघन करू नये ,गर्दी जमवू नहे असे आदेश असतानाही मंचर येथे मंगळवार दि ७ रोजी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल एस के सापटे, पोलीस कॉन्स्टेबल एस.के.काळडोके,पोलीस कॉन्स्टेबल भुजबळ , शहरात पेट्रोलिंग करत असताना मुळे वाडी येथे संतोष रामजी थोरात (वय ३८)यांनी आपले,ओम किराणा अँड जनरल स्टोयर हे दुकान उघडले होते. शांताराम सोपान बाणखेले (वय ६५)यांनी आपले विघ्नहर किराणा दुकान उघडले होते. सागर उत्तम जाधव यांनी आपले ऑटोमोबाईल चे दुकान उघडले होते तर किशोर विठ्ठल बाणखेले (वय ४८) यांनी आपले पूजा किराणा अँड जनरल स्टोअर हे दुकान उघडले होते. हे सर्व राहणार मंचर ता,आंबेगाव पुणे,यांच्यावर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्यावर मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेश पालन न करणे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायदा व साथीचे रोग कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून या बाबत पोलीस नाईक गणेश डावखर ,पोलीस नाईक विनोद गायकवाड यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस नाईक गणेश डावखर करत आहे.

Previous articleघोडेगाव पोलिसांची मटक्याच्या अड्ड्यावर व दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई
Next articleजऊळके येथील जुन्या पिढीतील चंद्रभागा खंडीझोड यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन