जऊळके येथील जुन्या पिढीतील चंद्रभागा खंडीझोड यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

राजगुरुनगर-जऊळके (ता.खेड) येथील जुन्या पिढीतील चंद्रभागा विठ्ठल खंडीझोड (वय ७९ वर्षे) यांचे नुकतेच मुंबई येथे वृध्दापकाळ व आजाराने दुःखद निधन झाले.

भाजपचे विधानभवन कार्यालय सेक्रेटरी राजुशेठ खंडीझोड यांच्या त्या मातोश्री असून खेड तालुक्यातील अनेक विकासकामांसाठी राजुशेठ खंडीझोड यांचे मोलाचे योगदान आहे.

कै.चंद्रभागा खंडीझोड यांच्या निधनाबद्दल ग्रामविकास प्रतिष्ठान,शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान पिंपरी, कळमोडी पाणलोट विकास संस्था यांचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

ग्रामविकास प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विलासराव भोईर,उपाध्यक्ष विलासराव शिंदे, कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे कार्याध्यक्ष दिलीपराव चौधरी, कोनगाव भिवंडी येथील उपसरपंच जयंत टावरे, ग्रामविकास प्रतिष्ठानचे सेक्रेटरी सुभाषराव गोरडे,संचालक व माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास दौंडकर यांनी श्रद्धांजली अर्पण करून खंडीझोड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली आहे.

Previous articleमंचर मध्ये नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
Next articleखडकवासला धरणाच्या परिसरातील शेतकऱ्यांची भातलावणीची लगबग सुरू