लोणीकंद पोलीस ठाण्याचा कारभार आता पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत

गणेश सातव , वाघोली

गेले अनेक दिवसापासून पुणे ग्रामीण पोलीस दलातील लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे आयुक्तालयाला जोडण्यासाठी शासनपातळीवर जोर धरला होता.त्या गोष्टीला आज खऱ्या अर्थाने पूर्णविराम लागला. रात्री पहाटे १२ वाजता हि दोन्हीही पोलिस ठाणे पुणे शहर पोलिस आयुक्त कार्यालयास जोडण्यात आली आहे.

ग्रामीण पोलिस दलावर असणारा कामाचा वाढता ताण,अपुरी कर्मचारी संख्या,परिसरातील वाढती लोकसंख्या,वाहतूक समस्या,गुन्ह्यांचे वाढते प्रमाण या सर्व कारणांमुळे गृहविभागाकडून या दोन्ही पोलिस ठाण्याचा समावेश पुणे शहर पोलिस आयुक्तालयात करण्यात आला आहे.

आता पुणे पोलिस आयुक्तालया अंतर्गत असणाऱ्या पोलिस ठाण्यांची संख्या ३२ झाली असून,शहरातही नव्याने ४ पोलिस ठाण्याची भर पडणार आहे.

Previous articleशेतात रक्षा विसर्जन करून केले वृक्षारोपण: हरपळे परिवाराचा स्तुत्य उपक्रम
Next articleपरवानगीनंतरही भीमाशंकर मंदिर परिसरात शुकशुकाट