शेतात रक्षा विसर्जन करून केले वृक्षारोपण: हरपळे परिवाराचा स्तुत्य उपक्रम

अमोल भोसले

सध्या सुरू असणारे पाणी प्रदूषण व त्यामुळे वाढत चालले विविध आजार याची जाण असल्याने आळंदी म्हातोबा येथील ग्रामस्थानी पर्यावरण जपले जावे यासाठी वृक्षारोपण चा उपक्रम हाती घेतला असून कुटुंबातील मयत व्यक्तींची आठवण रहावी म्हणून त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केले जात आहे व अस्थींचे पाण्यात विसर्जन न करता त्या अस्थी खड्यात विसर्जित करून त्यावर झाड लावले जात आहे.

आळंदी म्हातोबा येथील विविध विकास सोसायटीचे माजी चेअरमन योगेश हरपळे यांचे वडील साहेबराव हरपळे(वय ७०) यांचे ( दि.१८) रोजी निधन झाले.नियमानुसार अंत्यविधी झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी पर्यावरणाचा विचार कारून एका आदर्श उपक्रमास साथ दिली.योगेश हरपळे व भाऊसाहेब हरपळे व त्यांच्या जावयांनी अस्थी विसर्जित न करता वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार (दि.२२ ) रोजी त्यांनी शेतातच खड्डा घेऊन त्याठिकाणी अस्थी विसर्जित केल्या व त्याठिकाणी वडिलांची आठवण म्हणून आंब्याचे झाड लावले.

यावेळी आळंदी म्हातोबा येथील प्रमोद शहा,योगेश जवळकर,मोहन नागवडे,सुरेश जवळकर बाळासाहेब जवळकर,अजिंक्य नागवडे व संपूर्ण हरपळे परिवार उपस्थित होते.

याशाच पद्धतीने पंचक्रोशीतील ग्रामस्थानी पर्यावरणाचा विचार करावा व वृक्षारोपण करून निसर्गाला साथ द्यावी असे मत प्रमोद शहा यांनी मांडले.

Previous article….अन्यथा संपूर्ण राज्यातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू – रमेश हांडे
Next articleलोणीकंद पोलीस ठाण्याचा कारभार आता पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत