दौंड मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांच्या कडक सूचना

दिनेश पवार,दौंड

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दौंड पोलिसांनी कडक नियम जारी केले आहेत, जो कोणी या नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्यावर कडक स्वरूपाची कारवाई देखील सुरू केली आहे,दि.20 मार्च 2021 रोजी सांयकाळी 5 ते 7 वा दरम्यान या दोन तासांत विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान विनामास्क 100 केसेस एकूण 20500 रु दंड,आस्थापना वर 5 केसेस 2500 रुपये, दंड व भा.द.वी.का.क.188 प्रमाणे 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांसाठी खालील नियम जारी करण्यात आले आहेत
# हॉटेल रेस्टॉरंट, लॉज,बार,परमिट रूम, हे सर्व 50% क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंत चालू ठेवावे व पार्सल सेवा रात्री 11 वा. पर्यँत चालू ठेवावी
पान टपरी वर एका वेळी 5 लोकांना परवानगी राहील लग्न समारंभात पोलिसांच्या पूर्व परवानगीने फक्त 50 लोकांना परवानगी राहील.अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी असेल
आठवडा बाजार हा शिफ्ट मध्ये भरवण्यात यावा सर्व ग्रामपंचायत व नगरपरिषद याचा पाठपुरावा करतील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमासाठी कोणीही नागरिक एकत्र येणार नाहीत
सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे त्याचबरोबर सॅनिटायजर चा वेळोवेळी वापर करणे,सोशल डिस्टन्स पाळणे,सर्व सार्वजनिक ठिकाणांवर सॅनिटायजर चा वापर करणे आवश्यक आहे.

काळजी घ्या,सतर्क रहा,नियमांचे पालन करावे,कोरोना पासून बचाव करण्यासाठी सतर्क राहणे खूप गरजेचे आहे, सर्वांनी नियमांचे पालन करावे ,सदर बाबींचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे दौंड प्रोबेशनरी पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले

Previous articleअण्णासाहेब मगर बँकेच्या तीन सभासदांची हकालपट्टी
Next articleखा.डॉ.अमोल कोल्हे यांना प्राईम पॉइंट फाउंडेशनचा संसद रत्न पुरस्कार प्रदान