क्रांतीज्योती साविञीबाई फुले पुण्यतिथी साजरी

राजगुरूनगर- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर(ता.खेड) येथे भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्ञी शिक्षणाच्या प्रणेत्या ,विद्येची जननी, क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या पुण्यतिथी चे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रातील शाळाप्रमुख महिला शिक्षिका श्रीम. सुरेखा मेहेञे, श्रीम. वैशाली धोञे, श्रीम. उषा बनकर, सौ. योगिनी म्हसुडगे यांनी प्रतिमेचे पूजन केले.

या वेळी कनेरसर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. बाळासाहेब गावडे (सर) यांच्या हस्ते कनेरसर केंद्रातील शाळाप्रमुख महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करुन मोजक्याच शाळाप्रमुख शिक्षक बंधू भगिणींच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Previous articleनारायणगाव येथील डॉक्टर गोसावी यांच्या राहत्या घरामध्ये जबरी चोरी
Next articleखेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न