दुचाकी चोरट्याला मंचर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रमोद दांगट,निरगुडसर

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वडगावपीर ( ता.आंबेगाव) येथून (दि.१९ ) रोजी ओमकार संभाजी आदक ( वय २५ )यांची बजाज कंपनीची ८० हजार रुपये किमतीची एम.एच.१४ एफ.ई. ६२३५ ही दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची तक्रार त्यांनी ( दि.२३)रोजी मंचर पोलीस ठाण्यात केली होती याबाबत तपास करत असताना मंचर पोलिसांनी सुनील आबाजी सुक्रे ( वय वर्षे २३ , रा. खडकवाडी ता.आंबेगाव जिल्हा पुणे ) याला अटक केली असून त्याच्या कडून चोरीला गेलेली बजाज कंपनीची पल्सर गाडी पोलिसांनी हस्तगत केली आहे.

हा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी खेड विभाग अनिल लंबाते ,मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तानाजी हगवणे, पोलीस नाईक संजय नाडेकर, पोलीस नाईक नवनाथ नाईकडे, पोलीस शिपाई फिरोज मोमिन, यांनी केला आहे.

Previous articleपुणे नाशिक महामार्गावर खाजगी बस जळून खाक ;द बर्निंग बस’चा थरार
Next articleरांजणगाव एमआयडीसीत कामगारांना लुटणाऱा जेरबंद