रांजणगाव एमआयडीसीत कामगारांना लुटणाऱा जेरबंद

अमोल भोसले, उरुळी कांचन

रांजणगाव एमआयडीसी तील कंपनी मध्ये काम करणारा सेक्युरिटी गार्ड रामदास मंडलिक केदार( वय २१, वर्षे, रा.पाचंगे वस्ती ढोकसंगवी ता. शिरुर) यांना (दि.२०) रोजी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास आयटीआय कॉलेज जवळून पायी कारेगाव कडे जात असताना अंधाराचा फायदा घेऊन चार अज्ञात चोरट्यांनी त्यांना लाकडी दांडके, लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन त्यांचे कडील मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल जबरीने चोरुन पळून गेले होते. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक करत असताना रांजणगाव एमआयडीसी मध्ये कामगारांना लुटणारी टोळी विकास संजय रोडे (रा.करडे,ता.शिरुर) याची असून त्याचे सोबत ३ ते ४ अल्पवयीन चोरटे आहेत. अशी बातमी गुप्त बतमीदारामार्फत मिळाली. त्या अनुषंगाने खातरजमा करुन आरोपी विकास संजय रोडे (वय ,१९ वर्षे, रा.करडे ,ता.शिरुर) याला करडे गावातून तसेच त्याचे इतर चार अल्पवयीन साथीदार यांना कारेगाव, बाभूळसर खुर्द, करडे या गावातून चौकशी कामी सोबत घेऊन, चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच (दि.२१)रोजी रात्री ९ वा सुमारास रांजणगाव एमआयडीसीतील एसीबीआय चौक येथे रोहित बर्मा खवळे (रा.कारेगाव, ता.शिरुर) हा कामगार पायी जात असताना त्याचा देखील विकास संजय रोडे व त्याचे इतर तीन अल्पवयीन साथीदार यांनी मोबाईल जबरीने हिसकावून नेला होता. सदरचा गुन्हा देखील त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले, त्याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करणेत आला आहे.

आरोपी विकास संजय रोडे (रा. करडे , ता.शिरुर ) याने वेगवेगळे तीन अल्पवयीन साथीदार सोबत घेऊन दोन्ही गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून त्याचे कडून गुन्ह्यात चोरी केलेले दोन मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल हस्तगत करून आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांचे ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख , बारामती अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट , सहा पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, फौजदार दत्तात्रय गिरमकर, पो हवा उमाकांत कुंजीर, पो हवा जनार्दन शेळके, पो ना मंगेश थिगळे, पो ना अजित भुजबळ , पो ना मोहम्मद अंजर मोमिन , पो कॉ अक्षय नवले यांनी केलेली आहे.

Previous articleदुचाकी चोरट्याला मंचर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Next articleपिपंळे खालसाच्या सरपंचपदी सौ.सुप्रिया धुमाळ तर उपसरपंचपदी राजेंद्र धुमाळ यांची बिनविरोध निवड