पुणे नाशिक महामार्गावर खाजगी बस जळून खाक ;द बर्निंग बस’चा थरार

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील शिरोली गावाच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर खरपुडी फाट्याजवळ आज (ता. २ मार्च) पहाटे एका खाजगी प्रवासी बसने पेट घेतल्याची घटना घडली. बस जळून खाक झाली.मात्र घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.सर्वांचे नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही अथवा कुणी जखमीही झाले. मात्र पहाटेच्या सुमारास तेथून जात असलेल्या वाहनांतील प्रवाशांना हा ‘द बर्निंग बस’चा थरार पाहावयास मिळाला.

धुळ्याहून पुण्याकडे ( एम एच ०३ – सी. पी. ९९४५ ) खासगी कंपनीची प्रवासी बस चालली होती. पहाटे साडेचार पाचच्या सुमारास बस गरम झाल्याने आणि खालून धूर दिसू लागल्यावर चालकाने बस शिरोलीच्या पुढच्या खरपुडी फाट्याजवळ चुनदीच्या टप्प्यावर थांबवली.बसमधील ५० प्रवासी खाली उतरले, तोपर्यंत धुराचे लोट वाढले आणि पाचच मिनिटात बसने पेट घेतला

Previous articleरसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबिर
Next articleदुचाकी चोरट्याला मंचर पोलिसांनी ठोकल्या बेड्या