लांडेवाडी येथे कोयता ,लाकडी दांडक्याने तुफान हाणामारी

प्रमोद दांगट

घोडेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पिंगळवाडी लांडेवाडी ता. आंबेगाव येथील सोमनाथ चंद्रकांत पिंगळे व दीपक तुकाराम पिंगळे यांच्यात शेतातील बांधावरील खडे व माती शेतात येते ,तसेच शेतात रस्त्यावरून जाताना गवत उचलून नेत जा रस्त्यावरील धूळ पोरांच्या तोंडात जाते या कारणावरून जोरदार हाणामारी झाली असून या दोघांनी एकमेकांच्या विरोधात घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्यादी दाखल केले आहेत.

याबाबत सोमनाथ चंद्रकांत पिंगळे ( वय वर्ष 30 रा. लांडेवाडी पिंगळवाडी ता. आंबेगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 26/2/2021 रोजी फिर्यादी सकाळी 9 वाजता आपल्या मक्याच्या शेतात पाणी भरत असताना त्याचे चुलते बजरंग महादू पिंगळे,व वडील चंद्रकांत पिंगळे शेतात असणाऱ्या गोठ्याच्या जवळ बसले असताना दीपक तुकाराम पिंगळे हा हत्ती गवत रस्त्याने ओढून घेऊन चालला होता त्यावेळी चुलते बजरंग पिंगळे यांनी दीपक पिंगळे याला गवत उचलून घेऊन जावा गवत ओढत नेल्यावर त्याची धूळ उडून पोरांचे तोंडात जाते असे म्हणाले असता बजरंग पिंगळे व दीपक यांच्यात वाद झाला त्यावेळी दीपक पिंगळे यांनी शिवीगाळ करत फिर्यादी चे वडील चंद्रकांत पिंगळे यांना शिवीगाळ दमदाटी केली त्यावेळी फिर्यादी तेथे जाऊन माझ्या वडिलांना शिवीगाळ का करतो असे म्हणाला असता दीपक पिंगळे यांनी गवत कापण्यासाठी आणलेला कोयता चंद्रकांत पिंगळे यांच्या डोक्यात व डाव्या मांडीवर मारला तसेच फिर्यादी सोमनाथ पिंगळे यांच्याही डोक्याच्या मागील बाजूस दीपक पिंगळे यांनी कोयता मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या बाबत दीपक तुकाराम पिंगळे (रा. लांडेवाडी पिंपळवाडी ता.आंबेगाव पुणे )याच्याविरोधात सोमनाथ पिंगळे यांनी फिर्याद दिली आहे .

तसेच दीपक तुकाराम पिंगळे वय 48 रा. लांडेवाडी पिंगळवाडी ता. आंबेगाव जिल्हा पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 26/2/2021 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी शेतात जनावरांसाठी हत्ती गवत कापण्यासाठी मुलगा सिद्धेश याच्यासह गेले असता त्यांच्या शेजारी राहणारे बजरंग महादू पिंगळे त्याला म्हणाले की रस्त्याने जाताना बांधावरील खडे व माती आमची शेतात येतात असे म्हणून भांडू लागले त्या वेळी चंद्रकांत महादू पिंगळे तेथे आले व त्यांनी फिर्यादिस आमचे शेतातून जायचे नाही असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यावेळी फिर्यादीने मी सामाईक बांधावरुन जात असतो आमची वाट का आडवता असे म्हणाले असता सोमनाथ पिंगळे यांनी घराजवळील मोठे लाकडी दांडके हातात घेऊन फिर्यादी दिपक पिंगळे यांना जोरात मारले तसेच त्यावेळी चंद्रकांत महादू पिंगळे यांनीही फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यावेळी फिर्यादी याचा मुलगा सिद्धेश हा भांडणे सोडण्यासाठी आला असता सोमनाथ पिंगळे यांनी त्यालाही धक्काबुक्की केली असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. याबाबत फिर्यादी दिपक पिंगळे यांनी बजरंग महादू पिंगळे ,चंद्रकांत महादू पिंगळे, सोमनाथ चंद्रकांत पिंगळे,( सर्व रा. लांडेवाडी, पिंगळवाडी ता. आंबेगाव जिल्हा पुणे ) यांच्याविरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Previous articleगंभीर गुन्हे दाखल असलेल्या तडीपार आरोपीला मंचर येथे पकडले
Next articleपुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये १४ मार्चपर्यंत राहणार बंद