पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये १४ मार्चपर्यंत राहणार बंद

पुणे- कोव्हीड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायायोजनांच्या अनुषंगाने शाळा, महाविदयालये, सर्व खाजगी क्लासेस व इतर शाळा दि. १४ मार्च पर्यंत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशान्वये बंद ठेवण्यात येणार आहे.

पुणे जिल्हयातील इ. १० वी, १२ वी च्या विदयार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. नियोजित परिक्षा आवश्यक असल्यास कोरोना – १९ विषाणुच्या उपाय योजनांचे पालन करून घेण्यात याव्यात शक्यतो ऑनलाईन पध्दतीने परिक्षा घेण्यात यावी. शाळा, महाविदयालये, सर्व खाजगी क्लासेस व इतर शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन पध्दतीने शाळा सुरू राहणार आहे.

सदर आदेशाचा भंग करणा-या कोणत्याही व्यक्ति, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोेग कायदा १८९७ आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व कायदयातील इतर नियमांन्वये योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी दि. २८ फेब्रुवारी पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.

Previous articleलांडेवाडी येथे कोयता ,लाकडी दांडक्याने तुफान हाणामारी
Next articleआसखेडच्या सरपंचपदी प्राची लिंभोरे बिनविरोध