गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तडीपार आरोपीला मंचर येथे पकडले

प्रमोद दांगट ,निरगुडसर

चाकण ,पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल असलेला व २४ महिन्यासाठी तडीपार केलेला आरोपी कुठलीही परवानगी न घेता आंबेगाव तालुक्यात फिरत असतानाची माहिती कळाल्यानंतर तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंचर (ता. आंबेगाव) येथे एका हॉटेलमध्ये स्वप्निल ऊर्फ सोप्या संजय शिंदे (वय २९, रा. रासे, चाकण, ता. खेड) हा पोलीस उपआयुक्त परिमंडळ १, पिंपरी- चिंचवड यांनी त्यांच्याकडील आदेशानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्द पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्द आणि पुणे ग्रामीण पोलीस हृदतून दोन वर्षाकरिता (२४ महिने) तडीपार केले असताना कोणतीही कायदेशीर पूर्वपरवानगी न घेता तडीपार आदेशाचा भंग केला असल्याचे आढळून आले आहे.

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट क्र. तीनचे पोलीस जवान योगेश कोळेकर यांनी आरोपी स्वप्निल ऊर्फ सोप्या संजय शिंदे यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. १९) फिर्याद दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान राजेंद्र हिले करीत आहेत.

Previous articleफेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल
Next articleलांडेवाडी येथे कोयता ,लाकडी दांडक्याने तुफान हाणामारी