सावरदरी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा: सरपंचपदी भरत तरस ; उपसरपंचपदी संदिप पवार यांची बिनविरोध निवड

Ad 1

चाकण- खेड तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी राखीव होते. सरपंचपदासाठी   भरत तरस व उपसरपंच पदासाठी संदिप बाळासाहेब पवार यांचे एकमेव अर्ज आल्याने सरपंचपदी भरत तरस तर उपसरपंचपदी संदिप पवार यांची बिनविरोध निवड झाल्याने सावरदरी ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकला.

सावरदरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गोंधळजाई परिवर्तन पॅनलने ७-० ने निवडणूक जिंकत २५ वर्षांचे सत्ता परिवर्तन केले होते.

सावरदरी ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. जे. मांदळे व ग्रामसेवक पी. ए. आत्तार यांनी सहायक म्हणून काम पाहिले.

Previous articleस्वाती सावंत यांची भाजपा महिला मोर्चा शिक्षक पुणे शहरअध्यक्ष पदी निवड
Next articleगावपातळीवर सांडपाणी व घनकच-याचे व्यवस्थापन करणे काळाची गरज – गटविकास अधिकारी जालींदर पठारे