स्वाती सावंत यांची भाजपा महिला मोर्चा शिक्षक पुणे शहरअध्यक्ष पदी निवड

पुणे शहर भाजपाची कार्यकारिणी व सर्वसाधारण सभा (दि 22 )  रोजी भाजप शहर कार्यालय जे एम रोड पुणे याठिकाणी जाहीर करण्यात आली. गेल्या विधानसभा 2019 निवडणूकीत भारतीय जनता पार्टी मध्ये स्वाती सावंत यांनी प्रवेश केला होता तसेच पार्टीमध्ये सर्कीय कार्यक्रर्त्या म्हणून काम करत आहेत. पार्टीने शहर कमिटी मध्ये दखल घेऊन त्यांना महिला मोर्चा- शिक्षक शहरअध्यक्ष हि जबाबदारी दिली आहे.

सौ. स्वाती सावंत ह्या अनेक सामाजिक संस्था मध्ये गेल्या अनेक वर्षापासुन सामाजिक कामात सर्कीय आहे, पती ॲड. संजय सावंत पाटील यांच्या कडे पुणे जिल्हा कायदा आघाडी- जिल्हाअध्यक्ष पदाची जबाबदारी आहे तसेच ॲड. संजय सावंत हे गेली 15 वर्षे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असतात त्यांच्या सोबत सौ. स्वाती सावंत कायमच वेगवेगळ्या सामाजिक कार्यात सहभागी होतात.

सौ. स्वाती सावंत यांनी सभेला संबोधले व सर्वाना विश्वास दिला पक्ष संघटन वाढवत आसताना येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमी वर मोठ्या प्रमाणात महिला शिक्षकांचे संघटन करु आशी ग्वाही दिली. तसेच पुढील काळात सर्व शिक्षकांच्या समस्या व सुविधा साठी सरकार कडुन न्याय मिळवुण देण्याचा प्रयत्न करु.

पुणे शहर भाजपाची कार्यकारिणी शहर कार्यालय याठिकाणी जाहीर करण्यात आली. प्रमुख कार्यकारीणी, मोर्चा अध्यक्ष व सरचिटणीस तसेच आघाड्यांचे संयोजक व सहसंयोजक, शहर व जिल्हा कार्यकारणी सदस्य, विशेष निमंञित यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

याप्रसंगी पुण्यनगरी चे भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष मा.आमदार जगदीशजी मुळीक, उपाध्यक्ष मा.धनंजय जाधव, उपाध्यक्ष डाँ श्रीपाद ढेकणे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा प्रणिताताई चिखलीकर तसेच पुणे शहर संपुर्ण कमिटी, महिला मोर्चा अध्यक्षा स्थायी समिती सदस्य अर्चनाताई पाटील, वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष मा. संतोष खांदवे, पुणे शहराचे सर्वच विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उपस्थित होते, इत्तर मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला..

Previous articleमोई विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या संचालकपदी मारुती येळवंडे व विशाल गवारी यांची निवड
Next articleसावरदरी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा: सरपंचपदी भरत तरस ; उपसरपंचपदी संदिप पवार यांची बिनविरोध निवड