श्री गुरुदत्त सेवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच – उपसरपंच, उपनिरीक्षक यांचा सन्मान

अमोल भोसले,उरुळी कांचन

छत्रपती शिवरायांचे विचार तरुण पिढीनी आत्मसात करणे आवश्यक आहे तसेच नाचून जयंती साजरी करण्यापेक्षा थोराचे चरित्र वाचणे महत्त्वाचे आहे असे मत उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांनी व्यक्त केले. उरुळी कांचन तुपे वस्ती येथे श्री गुरुदत्त सेवा विकास प्रतिष्ठान आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरे करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन यांनी शिवाजीराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.

याप्रसंगी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, भाजप प्रदेश व्यापारी पश्चिम अध्यक्ष विकास जगताप, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, ग्रामपंचायत सदस्या अनिता तुपे, शंकर बडेकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गुलाब गायकवाड, दादासाहेब भोंडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, ह.ता.पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळभोर, तुळशीराम घुसाळकर, विजय काळभोर, नंदिनी मुरकुटे, सुभाष बगाडे, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष सुरेेेश वाळेकर, मा.उपसरपंच रामभाऊ तुुपे, रोहिदास मुरकुटे, प्रसाद कांंचन, जयंत काकडे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा शिक्षक सेलचे सरचिटणीस बाळकृष्ण काकडे यांनी प्रस्ताविक केले तर श्री गुरुदत्त सेवा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील तुपे यांनी आभार मानले.

उरुळी कांचन, कोरेगावमुळ, शिंदवणे, सोरतापवाडी, तरडे, वळती, पेठ – नायगाव, आष्टापूर, भवरापूर याठिकाणी नवनिर्वाचित सरपंच – उपसरपंच, सदस्य यांच्या उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ठिकठिकाणी तरुण मंडळीनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन केले.

Previous articleयवत ते उरूळी कांचन “भव्य शेतकरी मोर्चा”
Next articleसायकल राईड २०२१ ला शिरूरकरांचा उस्फूर्त प्रतिसाद