यवत ते उरूळी कांचन “भव्य शेतकरी मोर्चा”

अमोल भोसले,उरुळी कांचन

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या ३ काळ्या कृषी कायद्यास विरोध करण्यासाठी व सध्या दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठींबा दर्शवण्यासाठी, “पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या” वतीने “भव्य शेतकरी मोर्चा रॅली” चे आयोजन यवत ते उरुळी कांचन येथे करण्यात आले.

पुरंदर हवेलीचे आमदार तथा पुणे जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, माजी खासदार अशोक मोहोळ, प्रवक्ते रत्नाकर महाजन, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे सदस्य देविदास भन्साळी, जिल्हा उपाध्यक्ष संग्राम मोहोळ, नंदुकाका जगताप, पृथ्वीराज पाटील, नंदू चौधरी, सत्यशील शेरकर, स्वप्नील सावंत, कौस्तुभ गुजर, लहू निवांगुणे, विठ्ठल खराडे, दिनेश सरताळे, जयप्रकाश बेदरे, एकनाथ चौधरी, दत्तात्रय बाजीराव कांचन, बंजरग म्हस्के, राजाराम कांचन, सुभाष टिळेकर, गणपत कड, अनेक शेतकरी व काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्च्यात सहभागी होते.

१५ किलोमीटर च्या रॅलीत अनेक शेतकरी स्वतः आणि ट्रॅक्टर घेऊन सहभागी होत गेले. ३ किलोमीटर पर्यंत रॅलीची रांग होऊन देखील, प्रशासनाला पूर्ण सहकार्य करुन शांततामय मार्गाने, महामार्गची कोंडी न करता व कोविड च्या नियमांचे संपूर्ण पालन करुन रॅली संपन्न झाली. मोर्च्याची सांगता उरुळी कांचन येथे झाली. प्रसंगी आमदार संजय जगताप ह्यांनी “शेतकरी विरोधी हे कायदे रद्द करण्यात यावे व मोदी सरकाने अहंकारी वृत्ती सोडून आपल्या अन्नदात्या शेतकऱ्याची हेटाळणी व अपमान न करता त्वरित कायदे मागे घ्यावेत. कृषिप्रधान भारत देशात शेतकरी किसानला अतिरेकी नक्षलवादी आणि गद्दार ठरवण्यासाठी आटोकाट नियोजनबद्ध प्रयत्न सोशल मीडिया वर चालवला जात आहे. पूर्वी विरोधी पक्षांना त्यांच मत मांडण्याची संधी दिली जात असे व त्यावरती सविस्तर चर्चा केली जात असे. मोदी सरकारच्या काळात कोणत्याही प्रकारची चर्चा न करता बिल पास केले जाते, व विरोधी पक्षाला बोलायची किंवा विरोध करायची संसदेत संधी देखील दिली गेली नाही” असे त्यांनी संबोधले. प्रसंगी अशोक मोहोळ, देविदास भन्साळी, रत्नाकर महाजन ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन महेशश ढमढेरे व आभार नंदकुमार चौधरी यांनी केले.

Previous articleसेकंडरी शिक्षक पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद – खा.डाॅ.अमोल कोल्हे
Next articleश्री गुरुदत्त सेवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच – उपसरपंच, उपनिरीक्षक यांचा सन्मान