सायकल राईड २०२१ ला शिरूरकरांचा उस्फूर्त प्रतिसाद

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिरुर नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर शहरात शारीरीक तंदुरुस्तीसाठी व नागरीकांच्या आरोग्यासाठी ‘ शिरूर सायकल राईड २०२१ चे आयोजन करण्यात आले होते. शिरुर नगर परिषद ,सायक्लॉन ग्रुप व ग्रीनथॉट ग्रुप यांच्या संयुक्त विदयमाने याचे सुंदर असे नियोजन करण्यात आले. लहान गटापासुन मोठया गटापर्यंत यामध्ये हजारो खेळाडुंनी सहभाग नोंदविला प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सेफ्टीसाठी हेल्मेट , मेडल ,मास्क , टी शर्ट , पाणी बॉटल व एनर्जीसाठी पॅकबंद चिक्कीबार देण्यात आले.

सकाळी ६ वाजल्यापासुन सहभागी खेळाडुंनी आपली उपस्थिती नोंदविली प्रशासनाने सांगितलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून जागोजागी सोशल डिस्टसन्स, मास्क लावणे , सायकल चालवताना ही स्पर्धा नसुन ही एक आरोग्यासाठी सायकल राईड आहे. अशा सुचना प्रत्येक ठिकाणी आयोजकाच्या वतीने तरुण कार्यकर्ते करत होते. शिरुर शहरातील हा पहिलाच उपक्रम असुन सुद्धा केवळ १५ दिवसात याचे नियोजन अतिशय शिस्तबध्द पध्दतीने करण्यात आले. ग्रामीण भागात एवढया मोठ्या प्रमाणात सादर होणारा हा पहिलाच उपक्रम त्यासाठी शिरूरकरांनी भरघोस असा प्रतिसाद दिला.

याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी सायकलस्वारांना ४ गटात विभागण्यात आले पहिल्या फेरी ला झेंडा दाखवण्यासाठी सभागृहनेते प्रकाश धारीवाल, दिनाभाभी धारिवाल, कु.आदित्य धारिवाल , कु. साक्षी धारीवाल, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, युवा नेते ऋषीराज अशोक पवार, मुख्याधिकारी महेश रोकडे सर्व नगरसेवक व नगरसेविका तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे उपस्थित होते.

Previous articleश्री गुरुदत्त सेवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच – उपसरपंच, उपनिरीक्षक यांचा सन्मान
Next articleसाक्षीगंधाच्या कार्यक्रमात गर्दी केल्याने कार्यालय मालकावर गुन्हा दाखल