विना मास्क फिरल्यास दंडात्मक कारवाई-पोलीस निरीक्षक नारायण

दिनेश पवार,दौंड

कोरोना चा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, खबरदारी म्हणून विनामास्क फिरणाऱ्यावर दौंड पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले,

कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे,त्यामुळे लग्न समारंभ,पार्ट्या,सभा,उत्सव,यात्रा यावरती शासनाकडून नियम करण्यात आले आहे,याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, विनाकारण बाहेर पडणे, मास्क न वापरणे,गर्दी करणे यामुळे कोरोना पुन्हा वाढू लागला आहे, परिस्थिती चिंताजनक होण्याअगोदर च आपण खबरदारी घेणे गरजेचे आहे, आवश्यकता असेल तरच मास्क वापरून बाहेर पडणे, सॅनिटायजर चा वापर वेळोवेळी करणे, सोशल डिस्टन्स पाळणे, कार्यक्रम काही काळासाठी थांबवणे, पोलीस, डॉक्टर, आरोग्य सेवक,प्रशासन यांना सहकार्य करणे गरजेचे आहे, कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे, जनतेने स्वयंप्रेरणेने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे

Previous articleदौंड मध्ये विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलीसांनी कारवाई
Next articleधर्मवीरगड संवर्धनासाठी प्रयत्न करणार-सिने अभिनेते सयाजीराजे शिंदे