दौंड मध्ये विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलीसांनी कारवाई

दिनेश पवार,दौंड

कोरोना चा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत, दौंड पोलीसांकडून विनामास्क फिरणाऱ्या 131 जणांवरती कारवाई करण्यात आली आहे,नियमापेक्षा जास्त लोक एकत्र येणे,विनामास्क फिरणे,लग्न समारंभ व इतर कार्यासाठी गर्दी करणे,विनाकारण फिरणे,सोशल डिस्टन्स न पाळणे अशांवर कडक स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे, एका दिवसात दौंड पोलिसांनी 131 विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करून अठरा हजार शंभर रुपये दंड वसूल करण्यात आला .

या कारवाई मध्ये पोलीस उपनिरीक्षक लोंढे,पालवे,पोलीस हवालदार गुपचे,हिरवे,पोलीस नाईक फाळके,मलगुंडे,वारे,पोलीस कॉन्स्टेबल वाघ,शेख,राऊत,पवार, चांदणे,वाकळे इत्यादी पोलीसानी ही कारवाई केलेली आहे, कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे,लग्न समारंभ इत्यादी ठिकाणी नियमापेक्षा जास्त गर्दी झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले

Previous articleअन्नदान करत शिवजयंती उत्सव साजरा
Next articleविना मास्क फिरल्यास दंडात्मक कारवाई-पोलीस निरीक्षक नारायण