धर्मवीरगड संवर्धनासाठी प्रयत्न करणार-सिने अभिनेते सयाजीराजे शिंदे

दिनेश पवार,दौंड

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पेडगावच्या किल्यावरती वृक्षारोपण करून तसेच परिसराचे संवर्धन करून साजरी करण्यात आली.

       छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचा पेडगावचा बहादूरगड/धर्मवीरगड साक्षीदार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी पेडगावी गनिमी कावा वापरत २०० अरबी घोडे व एक कोटीचा शाही खजिना मिळवला होता.हा परिसर पराक्रमी व स्वाभिमानी इतिहास सांगत आहे.त्यामुळे टीम धर्मवीरगड,शिवदुर्ग संवर्धन, पेडगाव ग्रामस्थ व समस्त शिवप्रेमींनी भव्य शिवजन्म उत्सवाचे आयोजन केले होते.

सिनेअभिनेते सयाजीराजे शिंदे सह्याद्री देवराई सामाजिक संस्था व टीम धर्मवीरगड पेडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ४०० स्थानिक झाडांचे वृक्षारोपण केले.

छत्रपती शंभुराजेंच्या शेवटच्या रक्तरंजित इतिहासाचा साक्षीदार किल्ले धर्मवीरगड / बहादूरगड आहे.जी भूमी शंभुराजेंच्या रक्ताने माखली त्या भूमीला आपली आस आहे.छत्रपती शंभुराजेंचा स्वाभिमानी बाणा व स्वराज्यासाठीच्या असह्य वेदना पेडगाव किल्यात घुमत आहेत.त्या पवित्र तेजोभूमीला वृक्षारोपण करत हरित साज चढवत आपण शंभुराजेंना अभिवादन केले व लवकरच बहादूरगडला भेट देऊन शंभूराजेंना अभिवादन करणार आहोत,असे मत सयाजीराजे शिंदे यांनी व्यक्त केले.

पेडगाव किल्ल्यातील ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी टीम धर्मवीरगड कार्यरत आहे.पेडगाव गडाचे संवर्धन टीम धर्मवीरगड व ७ वर्षांपासून श्री शिवदुर्ग संवर्धन करत आहे.टीम धर्मवीरगडने संवर्धन हेतू अनेक कामे केली आहेत.७५ गावातील टीम तयार करून स्मारकाचे ३६५ दिवस नित्याने पूजन केले जाते.छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून टीम धर्मवीरगडने २० सिमेंटी खुर्च्या,२ पाणपोई ,स्मारक परिसर लॉन,५ सिमेंट नळ्याचे आउटलेट,३ कचराकुंडी,कट्टर मशीन, कुऱ्हाडी, कोयते,खुरपे,चापर,खोरे,कुदळ,टिकाऊ,घमेले,१०० भगवे ध्वज,५००० लिटर पाण्याची टाकी,१००० फूट ठिबक सिंचन पाईप,२ पाणी बॅरल इत्यादी वस्तूंचे अनावरण करत किल्याच्या सेवेत रुजू केले.
पाताळेश्वर मंदिर लोखंडी प्रवेशद्वार व श्री छत्रपती संभाजीराजे उद्यान निर्माण केले आहे.भविष्यात किल्यात प्रकाश व्यवस्था,श्री छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय,श्री छत्रपती संभाजी महाराज  खेळणी घर पुरातत्व खात्याचा सल्याने निर्माण केली जाणार  आहेत.
टीमने गडाची माहिती देणारी दिनदर्शिका निर्णन करून १०००० प्रतीचे वितरण पूर्ण महाराष्ट्रात केले आहे.

या अनोख्या गडसंवर्धन शिवजयंती प्रसंगी बाळासाहेब पानसरे,भगवान कणसे,देविदास शिर्के,हरिभाऊ जगताप,तेजस खेडकर,सचिन झिटे,सिद्धांत खेडकर,रोहित कणसे,भाऊ घोडके,रोहित नवले,नंदकिशोर क्षीरसागर,मॅचिंद्र पंडित,अशोक गोधडे,राहुल परकाळे, डाळिंबकर,अनिकेत लगड,किरण दळवी,माऊली वाघमोरे,प्रवीण कापसे,धनंजय कूताळ, समस्त ग्रामस्थ पेडगाव व महाराष्ट्रातील शिवप्रेमी-शंभुप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleविना मास्क फिरल्यास दंडात्मक कारवाई-पोलीस निरीक्षक नारायण
Next articleछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करा-ह.भ.प. दर्शन महाराज कबाडी