अन्नदान करत शिवजयंती उत्सव साजरा

Ad 1

हवेली-वाघोली (ता.हवेली) येथील विजय गायकवाड युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करत समाजामध्ये एक वेगळा आदर्श दिला, या युवा प्रतिष्ठानच्या वतीने कष्टकरी, कामगार ,बेघर  यांसाठी काम करणाऱ्या संतुलन संस्थेतील  मुलांना जेवण देऊन शिवजयंती साजरी करण्यात आली.

शिवजयंतीचे औचित्य आणि त्यातच मिळालेल्या गोड जेवणामुळे या संस्थेतील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद अधिकच खुलून दिसत होता

यावेळी संतुलन संस्थेचे बस्तू रेगे, विजय गायकवाड युवा प्रतिष्ठानचे विजय गायकवाड ,बापूसाहेब पठारे, गोविंद चव्हाण, नरेश भोर, राजू चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, सोमनाथ पठारे, संतोष भरणे, प्रकाश खामकर, सुरेंद्र पठारे, सागर पठारे, यांच्यासह बालाजी मित्र मंडळ व वाघेश्वर पार्किंगचे पदाधिकारी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते