डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात  शिवजयंती  साजरी

  हवेली-बकोरी (ता.हवेली) येथील ग्रामस्थांच्या  वतीने बकोरीच्या डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात शिवजयंती उत्साहात साजरा करण्यात आली. या वेळी आकर्षक अशा फुलांनी सजावट करण्यात आली होती तर उपस्थितांच्या हस्ते महाराजांची विधिवत पूजा संपन्न झाली

बकोरी येथील डोंगरावर चंद्रकांत वारघडे ,संतोष जाधव,आनंदा बहीरट,रामदास गाडुते ,वाल्मीक अप्पा वारघडे ,शांताराम काळुराम वारघडे,यांनी गेले अनेक वर्षापुर्वी   गुरुवर्य पाटील गुरुजी ,बहीरट गुरूजी,मोहन आबा वारघडे व काही सहकार्याच्या  मदतीने आई भवानीमातेच्या मंदिराची स्थापना केली होती व त्या ठिकाणी  शिवजयंती साजरी केली होती.त्यानंतर गेलेअनेक वर्षांपासून त्याठिकाणी शिवजयंती साजरी होत होती परंतू त्याठिकाणी छत्रपतींचे स्मारक नव्हते मागील काही वर्षांपुर्वी युवक कार्यकर्ते सुनिल राजाराम कुटे व त्यांच्या  सहकाऱ्यांनी त्याठिकाणी विट वाळू नेहुन त्या ठिकाणी भव्य असे स्मारक उभे केले व त्यांना  ग्रामस्थांनी सहकार्य केले. बकोरीच्या डोंरावर होत असलेले वृक्षारोपण ,छत्रपतींचे स्मारक,भवानीमातेचे मंदिर,माती बंधारा यामुळे त्याठिकाणी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शासनाने मदत करणे गरजेचे असल्याचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शांताराम वारघडे यांनी यावेळी  सांगितले .

     सकाळी आई भवानी माता व छत्रपती शिवाजी महाराज यांना पंचामृताने स्नान घालून विधिवत पूजा करण्यात आली. व आरती करत  शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आल्याचे सुनील वारघडे यांनी सांगितले.

   या  कार्यक्रमासाठी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे,शांताराम वारघडे सदस्य ग्रामपंचायत बकोरी,सर्जेराव कुटे,रामदास सोनबा वारघडे,रामराव कुटे चेअरमन दत्तकृपा विविध कार्यकारी सहकारी संस्था बकोरी,सुनील कुटे,धनराज वारघडे,गणेश बहीरट, शिवव्याख्याते मुकुंद वेताळ (सर), चंद्रकांत पवार,भैया दात्रे ,आदि शिन्दे,रुशिकेश बहीरट ,अनिकेत बागाडे यांचेबरोबर शेकडो तरूण उपस्थित होते .

Previous articleमातोश्रीच्या हस्ते उद्घाटन  करुन समाज्यात दिला अनोखा संदेश
Next articleअन्नदान करत शिवजयंती उत्सव साजरा