घोडेगाव परीसरामध्ये शिवजयंती साजरी

Ad 1

सिताराम काळे

– राज्यात कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता शिवभत्कांनी शिवजयंती साध्या पध्दतीने साजरी केली. घोडेगाव (ता. आंबेगाव) मध्ये तहसिल कार्यालय, पोलिस ठाणे, ग्रामपंचायत काळेवाडी- दरेकरवाडी, छावा युवा संघटना, बजरंग दल, छत्रपती युवा प्रतिष्ठान, बी. डी. काळे महाविदयालय यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयाचे व शिवप्रतिमेची पुजन करण्यात आले.

तहसिल कार्यालय घोडेेगाव येथे शिवप्रतिमेचे पुजन तहसिलदार रमा जोशी, नायब तहसिलदार अनंंता गवारी यांचे हस्ते करण्यात आलेे. घोडेगाव पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलिस उपनिरीक्षक लहु शिंगाडे यांचे हस्ते शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले.

छावा युवा संघटना यांनी पुर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे पुजन माजी पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे, छावा संघटनेचे अध्यक्ष अॅड. मुरलीधर काळे, विनोद काळे, नरेंद्र काळे, कपिल काळे, धनंजय काळे, गणेश काळे, सोनु गाडे, वैभव शिंदे, राजेश काळे यांचे हस्ते करण्यात आले.

ग्रामपंचायत काळेवाडी दरेकरवाडी येथे शिवप्रतिमेचे पुजन सरपंच मंजुषा बो-हाडे, उपसरपंच व सदस्य यांचे हस्ते करण्यात आले. बी. डी. काळे महाविदयालय येथील आजी माजी विदयार्थ्यांनी महाराणी चौक व महाविदयालय येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळयाचे पुजन केले. तर छत्रपती युवा प्रतिष्ठान भवानी माळ येथे शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेे. प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका न काढता राज्य शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे घोडेगाव परीसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.