लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू

 अमोल भोसले,उरुळी कांचन

धावपळीच्या जीवनात कुटुंबाला आधार म्हणून महिलांनी छोटा व्यवसाय सुरु करावा. त्यामधून येणाऱ्या उत्पादना मधून कौटुंबिक खर्चाला हातभार लागेल. यापुढील काळात महिला व युवतीनी विविध शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. महिलांनी विविध योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी व्यवसाय उद्योग करावा जेणे करुन महिला सबलीकरण ही संकल्पना साकार होईल यासाठी लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था अर्थसाहाय्य निश्चितच करेल असे आवाहन उरुळी कांचन शाखेच्या लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्मचारी मयुरी बोडके यांनी मार्गदर्शन करताना केले.

उरुळी कांचन लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने महिलासाठी विशेष हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संस्थेच्या कर्मचारी मृणाल कांचन तसेच लक्ष्मी तलरेजा, शुभांगी परीट आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleपुणे विमानतळाला संत तुकारामांचे नाव देण्याची मागणी
Next articleॲड.दिलीप गिरमकर यांची शिरुर तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड