पुणे विमानतळाला संत तुकारामांचे नाव देण्याची मागणी

अमोल भोसले, पुणे

अखिल भारतीय वारकरी मंडळ पश्चिम महाराष्ट्र नियुक्तीपत्रक प्रदान व पदग्रहण सोहळा लोहगाव गाथा लॉन्स येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार आणि ख्यातनाम गायक अशी पंचक्रोषीतील संतांची मांदीयाळी एकत्र दिसून आली. श्रीसंत तुकाराम महाराजांचे आजोळ असणारे श्रीक्षेत्र लोहगाव या गावी छत्रपती शिवराय संत तुकाराम महाराजांच्या किर्तनातमध्ये येत असत. त्या काळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या निस्सीम भक्तीचे याच गावात अनेक चमत्कार भाविक भक्तांना अनुभवास मिळाले. श्रीसंत तुकाराम महाराजांचे बरेचसे बालपण याच लोहगावात गेले. त्यांच्या पवित्र मुखतून स्फुरलेले गाथेतील बरेचसे अभंग याच पुण्यभूमीतले आहेत आणि याच गावच्या पावन भूमीमध्ये सध्या विमानतळ असल्यामुळे लोहगाव विमानतळाला “श्री संत तुकाराम महाराज विमानतळ” नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली.

यावेळी दिपप्रज्वलन श्रीसदगुरुनाथ माऊलीनाथ महाराज वाळुंजकर, पं.पू.सुमंतबापू हंबीर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय किर्तनकार व संस्थापक अध्यक्ष हभप.प्रकाश महाराज बोधले होते. यावेळी कार्यक्रम स्वागत पुणे विभागीय कमिटी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दत्तात्रय महाराज सोळसकर व उपाध्यक्ष हभप.दिपक महाराज खांदवे यांनी केले. यानंतर संत वाडमय प्रचार प्रसार प्रमुख आनंद महाराज तांबे, रा कॉ.चे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रजी खांदवे यांनी आपल्या भाषणात लोहगाव विमानतळाचे नाव जगदगुरु संत तुकाराम महाराज विमानतळ केले पाहिजे अशी समस्त लोहगावकरांच्या वतीने मागणी करण्यात आली.त्यांच्या मागणीचा विचार करुन मा. आमदार व पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदिश मुळीक यांनी व मा.आमदार बापूसाहेब पठारे यांनी पाठींबा देवून सर्व वारकरी मंडळाच्या वतीने शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे ठरले.

यावेळी कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मा.आमदार आणि भा ज पा पुणे शहराध्यक्ष जगदिश मुळीक, मा.आमदार बापूसो पठारे, राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बोधलेबाबा, सुप्रसिद्ध गायक पंडीत कल्याण गायकवाड, केंद्रीय सदस्य शंकर महाराज शेवाळे, प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके, हभप आसाराम महाराज बढे, कृषी उतपन्न बाजार समिती मा.सभापती व वडगावशेरी मतदारसंघ भाजपाध्यक्ष संतोष (लाला) खांदवे पा, माजी पंचायत समिती उपसभापती बंडूशेठ खांदवे, लोहगांव मा.उपसरपंच सुनिल खांदवे तसेच नवनाथ मोझे, संपर्कप्रमुख युवराज शिंदे, मुख्य सचिव गणेश डावरे, सहजिल्हाध्यक्ष श्री.राजाभाऊ म.भाडळे, जिल्हाध्यक्ष सुखदेव म. ठाकर, पिंपरी चिंचवड अध्यक्ष विजय म.भोंडवे, विजय म. पवार, शांताराम मेदनकर, तुकाराम गवारी, राजाभाऊ टिंगरे, रमेश शेलार, प्रल्हाद टिंगरे, सुभाष बाबूराव खांदवे, बाळासाहेब शितोळे, हभप. मुक्ताजी नाणेकर, कोषाध्यक्ष भानुदास म.गुजर आदी राज्य, विभागीय, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी कासुर्डी ता.दौंडचे सुप्रसिद्ध किर्तनकार प्रवचनकार हभप.दत्तात्रय महाराज सोळसकर यांची तर उपाध्यक्षपदी लोहगांवचे किर्तनकार, प्रवचनकार हभप. दिपक महाराज खांदवे यांची तसेच ईतर पाच जिल्ह्यातील एकूण ६० पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रक, उपरणे, श्रीफळ, सन्मानचिन्ह व तुकारामगाथा देवुन सन्मानित करण्यात आले.

यावेळी संपूर्ण कार्यक्रम सुत्रसंचालन संदीप बोत्रे यांनी केले तर आभार आदित्य खांदवे यांनी मानले. त्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous articleश्रीक्षेत्र महाळुंगे येथे मोफत आरोग्य शिबीर;शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त स्तुत्य उपक्रम
Next articleलोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू