ॲड.दिलीप गिरमकर यांची शिरुर तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिरुर तालुका वकील संघटनेच्या सन २०२१ – २०२२ साला करिता झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदी.ॲड.दिलीप गिरमकर यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. सुहास लोखंडे व महिला उपाध्यक्षपदी ॲड. सरिता खेडकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
ॲड. गिरमकर यांनी ॲड. विरेंद्र सावंत यांचा तर ॲड. सरिता खेडकर यांनी ॲड सीमा काशीकर यांचा पराभव केला. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड प्रताप शिंदे व ॲड भागवत दिघे, ॲड रंजना घाडगे यांनी काम पाहिले. सचिवपदी ॲड साहेबराव जाधव, खजिनदारपदी ॲड अक्षय पाटणे व कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड स्नेहा कांबळे, ॲड हर्षद भुजबळ, ॲड रोहित पोटावळे, ॲड प्रकाश गावडे, ॲड महेश रासकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

विजयानंतर बोलतांना ॲड गिरमकर म्हणाले की शिरुर न्यायालया करिता आमदार ॲड अशोक पवार यांच्या प्रयत्नातून ३३.८० कोटी रुपये मंजूर झाल्याने मी माझ्या कार्यकाळात कोर्टाच्या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यास व वकील बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील.

ॲड गिरमकर यांच्या विजया करिता ॲड वसंतराव कोरेकर, ॲड. शिरीष लोळगे, ॲड वसंतराव उबाळे, ॲड शांताराम दोरगे, ॲड राजाराम जाधव, ॲड किरण आंबेकर, ॲड संजय वाखारे, ॲड प्रदीप बारवकर, ॲड संजय बेंद्रे, ॲड संपत ढमढेरे,ॲड विजय दुबे, ॲड रामभाऊ शितोळे, ॲड विजय फडतरे, ॲड दिगंबर भंडारी, ॲड सुरेश भुजबळ, ॲड येळे, ॲड आप्पासाहेब करपे,ॲड हनुमंत गाजरे यांनी विशेष प्रयत्न केले.

Previous articleलोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू
Next articleपद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान संपन्न