वाघेश्वर विकास प्रतिष्ठानकडून राम मंदिरासाठी एक लाखाची मदत

वाघोली-अयोध्येत सुरू असलेल्या राम मंदिर उभारण्यासाठी वाघोली (ता:हवेली) येथील वाघेश्वर विकास प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे.

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी वाघोलीत निधी संकलन समितीकडून मंदिर निर्माण हेतू निधी संकलन अभियान सुरू करण्यात आले आहे.अनुषंगाने वाघोली येथील वाघेश्वर देवस्थान च्या वतीने वाघेश्वर विकास प्रतिष्ठान कडून राम मंदिर उभारण्यासाठी एक लाख रुपये निधी धनादेश संधितांकडे देण्यात आला.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील, उपाध्यक्ष रामभाऊ दाभाडे, पंढरीनाथ कटके, शिवदास उबाळे, बाळासाहेब सातव पाटील, वसंत जाधवराव, डॉ.स्मिता कोलते, बाळासाहेब जगताप, दत्तात्रय कटके, सर्जेराव वाघमारे,सुनिल कावडे,वंदना थोरात, प्रियांका काळे, नवनाथ सातव,वाघेश्वर मंदिराचे गुरव रवींद्र काळे, अतुल शिंदे अदि मान्यवर उपस्थित होते.

Previous articleघोडेगाव परीसरामध्ये विना मास्कचे फिरताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करणार- प्रदिप पवार
Next articleश्रीक्षेत्र महाळुंगे येथे मोफत आरोग्य शिबीर;शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त स्तुत्य उपक्रम