Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
चाकण- खेड तालुक्यातील श्री क्षेत्र महाळुंगे येथील श्री समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज नाट्य क्रीडा मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे अखंडितपणे सुरु असलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्यात काही बदल करण्यात आले आहेत. सोहळ्याच्या कालावधीत मोजक्या कार्यकर्त्यांच्या महाराजांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे पूजन व इतर धार्मिक विधी अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सम्राट तुपे यांनी दिली.

मागील अनेक वर्षांपासून भव्यदिव्य स्वरूपात संपन्न करण्यात येत असलेला श्री क्षेत्र महाळुंगे येथील शिवजन्मोत्सव सोहळा या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दि. १९/२/२१ ते शनिवार दि. २०/०२/२१ पर्यंत दोन दिवस विविध सामाजिक बांधिलकी जोपासत समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
तसेच शनिवारी दि.२०/२/२०२१ रोजी स. १०:०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत श्री समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज नाट्य क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी ज्यात दात, कान, नाक आणि साधारण आजाराचे निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सोहळ्या दरम्यान दैनंदिन धार्मिक विधी व इतर सामाजिक कार्यक्रम शासनाने दिलेल्या कोरोना काळाचे नियम पाळून संपन्न करण्याचा निर्णय श्री क्षेत्र महाळुंगे ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे.
श्री समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज नाट्य क्रीडा मंडळाच्या वतीने सर्व स्थानिक नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की सर्वांनी या भक्तिमय शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा.
Download WordPress Themes Nulled and plugins.