घोडेगाव परीसरामध्ये विना मास्कचे फिरताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करणार- प्रदिप पवार

सिताराम काळे- राज्यामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने घोडेगाव व घोडेगाव परीसरामध्ये नागरिक विना मास्कचे फिरताना आढळल्यास त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतर व मास्क घालणे या नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. तरीही अनेक ठिकाणी नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. तसेच अनेकजण मास्क न घालता बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे पोलीसांकडून मास्क न घालणा-यांवर कारवाईला दि. १८ (गुरूवार) पासून पुन्हा जोरदार सुरवात करणार असून त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती नागरिकांना ध्वनीक्षेपकाव्दारे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी दिली आहे.

Previous articleवन विभाग शिवनेरीवर फुलविणार देवराई, जैन ठिबक कंपनीच्या सीएसआर मधुन २१ लाखांची ठिबक सिंचन सामुग्री बसविण्यात येणार
Next articleवाघेश्वर विकास प्रतिष्ठानकडून राम मंदिरासाठी एक लाखाची मदत