ॲड सरिता खेडेकर यांची शिरुर बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड

Ad 1

अमोल भोसले, उरूळी कांचन

शिरुर शहर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष ॲड सरिता अमित खेडेकर यांची शिरुर बार असोसिएशन महिला उपाध्यक्षपदी निवड झाली.
पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी पशुसंवर्धनच्या माजी सभपती सुजाता पवार यांनी ॲड सरिता खेडेकर यांचा सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिरुर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुज्जफर कुरैशी, महिला अध्यक्ष संगीता शेवाळे, युवक अध्यक्ष रंजन झांबरे, युवती अध्यक्ष तदनिका कार्डिले, पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थीचे उपाध्यक्ष राहिल शेख, युवा नेते सागर नरवडे उपस्थित होते.