छत्रपती शिवाजी महाराज जयंती शासनाने दिलेले नियमाप्रमाणे साजरी करावी- सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार

सिताराम काळे

– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घोडेगाव पोलीस ठाण्याचे हद्दीत कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत राज्य शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे साजरी करावी असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी केले.

शिवजयंती उत्सवानिमित्त पोलीस ठाणे हद्दीतील मंडळांची व नागरिकांच्या बैठकीचे आयोजन घोडेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आले होते, त्यावेळी प्रदिप पवार बोलत होते. याप्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष संतोष बो-हाडे, गणेश घोडेकर, मयुर मांदळे, संजय चासकर, अक्षय कुलकर्णी, संदिप अनंतराव आदि उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने निश्चित केल्यानुसार दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठया प्रमाणात साजरी केली जाते. कोव्हीड विषानुच्या पार्श्वभूमिवर उध्दभवलेल्या परिस्थितीचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराज जयंती साध्या पध्दतीने साजरी करावी. यासाठी राज्य शासनाने किल्ला शिवनेरी किंवा गड, किल्ल्यांवर जावू नये, कोणत्याही प्रकारचे सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करू नये, फक्त सोशल डिस्टन्सींगचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा.

शिवजयंतीच्या दिवशी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे यांचे आयोजन व जनजागृती करावी. तसेच कोव्हीड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन व इतर स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. प्रत्यक्ष उत्सव सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखिल पालन करावे, असे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.

Previous articleघोडेगाव ग्रामीण रूग्णालयात रूग्ण तपासणी वेळेत बदल
Next articleॲड सरिता खेडेकर यांची शिरुर बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड