नंदकुमार चौधरी यांची पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

सोरतापवाडी (ता. हवेली ) येथील नंदकुमार चौधरी यांची पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याचे निवडीचे पत्र पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष – आमदार संजय जगताप यांनी दिले आहे.

पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार संजय जगताप,आमदार संग्राम थोपटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य देविदास भनसाळी, शिवदास काळभोर, महेश ढमढरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे काम करणार आहे. तसेच काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी जोडून एकजुटीने व जोमाने कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी चौधरी यांनी निवडीनंतर सांगितले.

Previous articleराम मंदिरासाठी कासुर्डीतून ७० हजारांची देणगी
Next articleघोडेगाव ग्रामीण रूग्णालयात रूग्ण तपासणी वेळेत बदल