घोडेगाव ग्रामीण रूग्णालयात रूग्ण तपासणी वेळेत बदल

सिताराम काळे-ग्रामीण रूग्णालय घोडेगाव येथील रूग्ण तपासण्याची वेळ बदलण्यात आली असुन ती आता सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत असल्याची माहिती, किसान सभेचे उपाध्यक्ष राजु घोडे यांनी दिली.

घोडेगाव ग्रामीण रूग्णालयात केसपेपर काढण्यासाठी सकाळी नऊ ते साडेबारा होती. ही वेळ आदिवासी भागातील नागरिकांसाठी सोयीची नव्हती. त्यामुळे ही वेळ बदलून सकाळी १० ते १.३० करावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने २९ ऑक्टोंबर २०२० रोजी लेखी निवेदन रूग्णालय प्रशासनाला देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक अशोक नांदापुरकर, नितीन गिलोलीकर, पंचायत समिती सभापती संजय गवारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, घोडेेगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैदयकीय अधिकारी डॉ. एन. सी. वनवे, सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत गाढवे, किसान सभेचे कार्यकर्ते यांच्या समवेत घोडेगाव ग्रामीण रूग्णालयात बैठक झाली.

या बैठकीत ग्रामीण रूग्णालय घोडेगाव येथील केसपेपर वेळ सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत चालू राहिल. रूग्णांची तपासणी दुपारी २ वाजेपर्यंत तर इंजेक्शनची वेळ दुपारी ३ वाजेपर्यंत चालू राहणार आहे. तर पुन्हा सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत ग्रामीण रूग्णालय चालू राहणार आहे. किसान सभेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण रूग्णालय घोडेगाव येथील वेळ बदलण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचे किसान सभेचे राजु घोडे यांनी सांगितले.

Previous articleनंदकुमार चौधरी यांची पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड
Next articleछत्रपती शिवाजी महाराज जयंती शासनाने दिलेले नियमाप्रमाणे साजरी करावी- सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार