राम मंदिरासाठी कासुर्डीतून ७० हजारांची देणगी

अमोल भोसले,उरुळी कांचन

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाच्या होणाऱ्या अयोध्येतील राष्ट्रमंदिर – राममंदिरासाठी कासुर्डी गावातून ७०,०००रु देणगी लोकवर्गणीतून एकत्रित करुन आज रामसेवक हेंमतकुमार शितोळे व स्वप्निल ताम्हाणे यांच्या मार्फत SBI बँकच्या उरुळी कांचन शाखेमार्फत राममंदिरच्या अकाऊंटला पाठविण्यात आली.
राममंदिर निधि समर्पण अभियान मार्फत कासुर्डीत घरोघरी जावून स्वईच्छेने निधी गोळा करण्यात आला.

यामध्ये संयोजक कासुर्डीचे मा.सरपंच पांडुरंग आखाडे, चेअरमन सोपान गायकवाड, राहुल आखाडे, मयुर सोळसकर, लक्ष्मण खेनट, गणेश आखाडे, उध्दव आखाडे, संतोष आखाडे, दत्तात्रय आखाडे, प्रविण वीर, संदिप गाढवे, विनोद वीर, चंद्रकांत आखाडे, संतोष आखाडे, संदिप आखाडे, बापू जगताप, वसंत आखाडे, प्रविण वीर, विनोद वीर, अविनाश आखाडे, भारत जाधव आदि ग्रामस्थांनी एकत्रित येऊन बैठक घेऊन केले होते. समाजकार्य असो वा धार्मिक कार्य, राष्ट्रकार्य जे लोकहिताचे होणार आसेल अशा कोणत्याही कार्यास झोकून देवुन आसेच एकत्रितपणे संघटित समाजकार्य सुरु ठेवणार आसल्याचे मत मराठा महासंघाचे जिल्हा सचिव मयुर सोळसकर यांनी सांगितले.

Previous articleआण्णां – आबा एक अतूट नातं….!
Next articleनंदकुमार चौधरी यांची पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड