आण्णां – आबा एक अतूट नातं….!

आबा आज आपणांस देहरुपी जाऊन काही वर्ष झाली, पण तुम्ही दिलेला संघर्ष व सामान्यांसाठी उभा राहण्याचा विचार आजही तुम्हाला जीवंत ठेवत आहे ह्याबाबत महाराष्ट्राच्या मनात कोणतीही शंका नाही.

गेले 9/10 वर्ष नियमित खेड़ तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप मोहिते पाटिल हे मुंबई मंत्रालया समोरील चौकात 23 मार्च रोजी हुतात्मा राजगुरु बलिदान दिन साजरा करतात. या निमित्ताने विविध मंत्री श्रद्धांजली वाहण्यासाठी हजर असतात…

मात्र प्रत्येक वर्षी नित्यनियमाने न चुकता आण्णाच्यां सोबत आबा सकाळी 7 वाजता हजर असायाचे, त्यांचे क्रांती कारकांवरील प्रेम, श्रद्धा अतूट होती. मंत्रालय समोरील चौकास हुतात्मा राजगुरु चौक असे नामकरण व्हावे, या आण्णाच्यां मागणीस त्यांनी जोरदार पाठिंबा दिला. आणि आज जगाच्या शासकीय व्यवहारात आज महाराष्ट्राच मंत्रालय ….

हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई (भारत) असा होतोय… खरच अभिमान वाटतोय. आज आपल्या पुण्यतिथी दिनी मनातील भावना खुप दाटुन येत आहेत्. पण त्या भावना शब्दात व्यक्त होतील असे शब्द सुद्धा सुचत नाही. सामान्य घरातील मुलं राजकारणात येऊ शकतात व स्वतःच्या कर्तुत्वाच्या जोरावर समाजाच्या मनावर अधिराज्य करु शकतात हे जगाला दाखवणाऱ्या आबास सलाम….
आबा तुमच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन…!!!

शब्दांकन-श्री. चंद्रकांत किसन शिंदे
(संस्थापक/अध्यक्ष :- हुतात्मा राजुगुरु जनहित चेरिटेबल ट्रस्ट, मुंबई.)

Previous articleइमारतीच्या पूर्णत्वाचा दाखला देत पावणेतीन लाखांची फसवणूक
Next articleराम मंदिरासाठी कासुर्डीतून ७० हजारांची देणगी