इमारतीच्या पूर्णत्वाचा दाखला देत पावणेतीन लाखांची फसवणूक

सिताराम काळे, घोडेगाव

– आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पोखरी गावामध्ये मध्ये नविन बांधण्यात आलेल्या अस्मिता भवनाचे काम अपुर्ण अवस्थेत असताना जिल्हा परीषद उपविभाग आंबेगावचे शाखा अभियंता, उपअभियंता व ठेकेदार यांनी संगणमत करून संबंधित काम पुर्ण झाले असल्याचा पुर्णत्वाचा दाखला देवुन आर्थिक घोटाळा केला असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी, लेखी निवेदनाव्दारे श्री मुक्तादेवी सेवाभावी संस्था पोखरी यांनी केली आहे.

ग्रामपंचायत कार्यालय पोखरी इमारतीच्या वरती अस्मिता भवन बांधण्यासाठी सन २०१६ रोजी पेसा कायदा अंतर्गत २ लाख ६८ हजार ४३८ रूपयांचा निधी मंजुर झाला होता. सन २०१६ ते आजपर्यंत संबंधित कामामध्ये भिंतीना प्लॅस्टर, दरवाजे, खिडक्या, फरशीकाम, पत्र्यावरील ढापे, मुंढरे, जिन्याचे काम आदि कामे अपुर्ण असताना दि. ३१ जुलै २०१८ रोजी जिल्हा परीषद उपविभाग आंबेगावचे शाखा अभियंता, उपअभियंता यांनी पोखरी येथील अस्मिता भवनाचे काम पुर्ण झाले असल्याचा पुर्णत्वाचा दाखला देवून संबंधित ठेकेदारास संबंधित रक्कम देण्यात आली.

पेसा अंतर्गत आलेला निधी आदिवासी विभागातील आदिवासी बांधवांच्या विकास कामासाठी असताना जिल्हा परीषद उपविभाग आंबेगावचे शाखा अभियंता, उपअभियंता व ठेकेदार यांनी संगणमत करून आदिवासी बांधवांची व नागरिकांची फसवणुक करून आर्थिक घोटाळा केला असल्याचे दिसुन येत आहे, यासाठी संबंधितांवर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई, जिल्हाधिकारी पुणे, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आंबेगाव यांच्याकडे श्री मुक्तादेवी सेवाभावी संस्थेचे सुरेश सोळसे यांनी लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

Previous articleवाघापुरच्या उमाकांत कुंजीर यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड
Next articleआण्णां – आबा एक अतूट नातं….!