वाघापुरच्या उमाकांत कुंजीर यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

पुरंदर तालुक्यातील वाघापूर गावचे उमाकांत गोपीनाथ कुंजीर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. लहानपणापासुनच हुशार, जिद्दी असणारे उमाकांत शेतात काम करत त्यांचे वडील कै. गोपीनाथ रामभाऊ कुंजीर हे पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत होते ते अपघातामध्ये यवत येथे वारल्यानंतर उमाकांत कुंजीर यांनी कोल्हापूर येथे तालमीमध्ये शरीरयष्टी कमवून मेहनत व चिकाटीने सन २००२ मध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाले त्यानंतर लोणी काळभोर पोलीस स्टेशन , उरळी कांचन दूरक्षेत्र , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण, आर्थिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी नोकरी करुन आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला या सर्व ठिकाणी कुशलतेने नोकरी करुन खडतर प्रवास करुन अभ्यास करुन पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.

उमाकांत ने कष्टाच्या जोरावर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास पुण्यात सुरु केला सन २००२ मध्ये पोलिस दलात पोलिस अंमलदार म्हणुन भरती झाले पण आधिकारी होण्याचे स्वप्न स्वस्थ बसु देत नव्हते म्हणून त्यांनी २०१७ मध्ये पुन्हा परिक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आणि अधिकारी होण्याचे उमाकांत कुंजीर यांचे स्वप्न साकार झाले. उमाकांत कुंजीर यांच्यावर असंख्य मित्रमंडळी स्नेही यांचा शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. परस्थिती कशी असो पण आपले धेय्य निश्चितच असणे आवश्यक आहे आणि त्यानुसार प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे असा सल्ला नवतरुणांना कुंजीर यांनी दिला.

Previous articleरांजणी येथे गॅस सिलेंडरचा साठा जप्त
Next articleइमारतीच्या पूर्णत्वाचा दाखला देत पावणेतीन लाखांची फसवणूक