रांजणी येथे गॅस सिलेंडरचा साठा जप्त

प्रमोद दांगट निरगुडसर

रांजणी ( कारमळा ता.आंबेगाव ) येथे मंचर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये बेकायदेशीरपणे कमर्शियल, घरगुती सिलेंडरचा साठा जप्त केला आहे या छाप्या मध्ये 41 हजार रुपये किमतीच्या गॅस सिलेंडरच्या भरलेल्या व रिकाम्या टाक्या मंचर पोलिसांनी जप्त केले आहेत या प्रकरणी पोलिस जवान योगेश परशुराम रोडे यांनी तक्रार दाखल केली आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री नऊच्या सुमारास राजनी गावच्या हद्दीत कारमाळा येथील नवनाथ बन्सीलाल थोरात यांच्या बंद खोलीत गॅस सिलेंडर विक्री अथवा साठा या बाबत परवाना नसताना, बेकायदेशीरपणे कमर्शियल व घरगुती गॅस सिलेंडरचा साठा केला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांना मिळाली असता, श्री.कोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्पणा जाधव, पोलीस नाईक अजित मडके, पोलीस जवान आदिनाथ लोखंडे, पोलीस जवान एस. एन. शिंदे, पोलीस जवान योगेश रोडे यांनी पाहणी केली असता, बंद खोलीमध्ये 22,400/- रुपये किमतीच्या इंडियन कंपनीच्या निळ्या रंगाच्या कमर्शियल गॅस सिलेंडर च्या टाक्या 13 व अकरा रिकाम्या सिलेंडर टाक्या, 15,900/- रुपये किमतीच्या एचपी कंपनीच्या निळ्या रंगाच्या गॅस सिलेंडर त्यामध्ये आठ सीलबंद व 11 रिकाम्या टाक्या आढळून आले आहेत, भारत गॅस कंपनीच्या एक रिकामी कमर्शियल टाकी तर घरगुती वापराच्या सहा टाक्या अशा एकूण 41,000/- रुपये किमतीच्या गॅस टाक्या बेकायदेशीरपणे साठा करून ठेवल्याप्रकरणी मंचर पोलिसांनी टाक्या जप्त करून नवनाथ बन्सीलाल थोरात (रा. कारमळा, रांजणी ता. आंबेगाव जि.पुणे) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे, पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत.

Previous articleसतीश भाकरे सारखे प्रामाणिक बातमीदार होणे दुर्मिळ – जेष्ठ पत्रकार संतोष वळसे पाटील यांनी दिला आठवणींना उजाळा
Next articleवाघापुरच्या उमाकांत कुंजीर यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड