सतीश भाकरे सारखे प्रामाणिक बातमीदार होणे दुर्मिळ – जेष्ठ पत्रकार संतोष वळसे पाटील यांनी दिला आठवणींना उजाळा

पत्रकार आणि सर्वांना चुटपूट लावणारी गोष्ट म्हणजे टाकळी हाजी ता. शिरूर येथील दैनिक पुढारीचे बातमीदार सतीश भाकरे यांचे दुर्दैवी झालेले निधन सतीश चे असे अचानक जाणे मनाला चटका लावणारे असल्याचे आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष वळसे पाटील यांनी सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी जेष्ठ पत्रकार वळसे पाटील यांनी सांगितले की सतीश आणि माझा जवळपास दहा वर्षापासून संपर्क टाकळी हाजी डेट लाईन मिळावी म्हणून त्यावेळी त्यांनी मला फोन केलेला चांगला आठवतो, दैनिक पुढारी चे सहयोगी संपादक सुहास जगताप साहेब यांच्याशी बोलणे झाले आणि त्यांनी टाकळीहाजी येथून सतीशने बातमीदारी सुरू करावी यासाठी सांगितले .त्यानंतर सतीश भाकरे यांनी सचोटीने बातमीदारी करत बेट भागात तसेच आंबेगाव शिरूर तालुक्यातील हद्दीवरील गावांच्या निर्भीड बातम्या देऊन आपली बातमीदारी जागृत ठेवली. कमी बोलणं आणि कामात राम शोधणारे पत्रकार आहेत, त्यामध्ये सतीशचा अग्रक्रम नेहमीच एक नंबर राहिला. विधानसभा निवडणुकीत बातम्या करण्यासाठी सतीश भाकरे, मधु गायकवाड ,किशोर खुडे मंचर येथे असायचे, त्यांनी बातम्या केल्यानंतर त्या बातम्या मी पाहून पुढे वृत्तसंस्था ना फॉरवर्ड करायचा , त्या माध्यमातून सतीशची बातमीदारी जवळून अनुभवायला मिळाली .भीमाशंकर साखर कारखाना आणि त्यापाठोपाठ पराग सहकारी साखर कारखान्यात काम करत असताना शेतकऱ्यांच्या आणि कारखानाचा समन्वय ठेवण्याचे काम सतीश ने मोठ्या मेहनतीने पार पाडले.टाकळीहाजी परिसरात झालेले अपघात किंवा सर्पदंशाच्या झालेल्या घटनांमधील रुग्णांना वैद्यकीय उपचार तातडीने मिळावी यासाठी सतीश नेहमीच मला फोन करायचा, साधारण सात-आठ महिन्यांपूर्वी सर्पदंश झालेली महिला मंचर उपजिल्हा रुग्णालयात येत आहे ,तेथील डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी सांगावे म्हणून त्याने मला फोन केला. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्या महिलेला जीवदान मिळाले , त्यावेळेस आभार व्यक्त करण्यासाठी सतीश आणि त्यांचे सहकारी मला मंचर येथे भेटण्यासाठी आले .त्यावेळी मी नम्रपणे सांगितले की उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत. त्यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे, म्हणून त्यांचे आभार माना असे म्हणून मी सतीश उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी गेलो. त्यावेळी अतिशय नम्रपणे सर्वांचे आभार मानून अशीच वैद्यकीय सेवा असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंचर उपजिल्हा रुग्णालय असे त्याने आवर्जून सांगितले . अशाप्रकारे सतीश च्या

असंख्य आठवणी माझ्या मनात आहे. हृदय विकारा सारखे आजार ताणतणाव यामुळे जडतात असे डॉक्टर नेहमी सांगतात. त्यामुळे सर्व पत्रकार बांधवांनी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी प्रयत्न करावा. बातमीदारांनी आपण वैद्यकीय दृष्ट्याफिटनेस आहे किंवा नाही यासाठी किमान तीन ते सहा महिन्यातून आपण आणि आपल्या कुटुंबीयांची वैद्यकीय तपासणी केली पाहिजे. कामाच्या दगदगीत अति ताण यामुळे हृदयविकार यासारखे झटके येतात याला अति तान म्हटले तरी वावगे होणार नाही, त्यासाठी प्रत्येकाने तणावमुक्त जीवन जगून बातमीदारी केली पाहिजे. एखाद्या बातमी दाराचे अकाली , हृदयविकाराने किंवा अपघाताने निधन झाल्यानंतर सर्वच सर्वजण हळहळ व्यक्त करतात. पंधरा-वीस दिवस दुःख सहन करतात .परंतु त्यानंतरही आपण आपल्या आरोग्याची खरोखरच काळजी घेतो का याचे मात्र अनेकांना भान राहत नाही .घटना घडल्यानंतर चुटपुट लागते, परंतु घटना होऊ नये यासाठी सर्वांनीच वेळेवरच आरोग्य तपासणी करून आपले सदृढ जीवन जगले पाहिजे. सतीशने कधीही बातमीदारी चा अहंकार वाटू दिला नाही .नेहमीच एक सर्वसामान्य बातमीदार म्हणून त्यांनी अन्यायाच्या विरोधात पुढारी च्या माध्यमातूनलढा देण्याचे काम केले , नाहीतर आता अलीकडच्या काळात बातमीदार म्हणजे काय हे नको वाटते सांगायला. सद्यस्थितीत सतीश सारखे प्रामाणिक बातमीदार होने दुर्मिळ झाले आहे. सतीश चा मित्र परिवार साखर कारखाना, पत्रकार बांधव आणि शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.सोमवारी सकाळी ठीक पावणे आठ वाजता पुढारीचे सहयोगी संपादक सुहास जगताप साहेब यांचा फोन आला, अरे सतीश भाकरे यांचे निधन झाल्याचे समजते , असे ऐकताच माझ्या अंगावर शहारे आले. त्यानंतर मी खात्री करण्यासाठी शिरूर तालुकापत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते , शहाजी पवार, वरिष्ठ पत्रकार शरद पाबळे यांना फोन करून खात्री करून घेतली . सतीशच्या निधनाची बातमी जगताप साहेब यांना सांगताच त्यांनी ही हळहळ व्यक्त केली सतीश च्या पाठीमागे वडील आहे .परंतु त्यांनाही दुर्धर आजाराने ग्रासले आहे. महिन्याला पाच ते सहा हजार रुपयांचा गोळ्या औषधासाठी खर्च आहे .तसेच पत्नी ,२लहान मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यामध्ये आठवीमध्ये शिकणारी मुलगी आहे, तसेच इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा मुलगा आहे. आणि एक मुलगा गतिमंद आहे. त्यामुळे या कुटुंबाला उभारी देण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन दैनिक पुढारी सहयोगी संपादक माननीय सुहास जगताप साहेब यांनी केलेले आहे. त्यामध्ये पुढारी चे बातमी दारही आपल्या कुवतीनुसार मदत करतील असे जगताप साहेब यांनी सांगितले आहे. सतीश चा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक १८रोजी सकाळी साडेआठ वाजता माळवाडी टाकळीहाजी येथे होणार आहे.सतीशच्या दुर्दैवी जाण्याने सर्वांना चुटपुट लागून राहिली आहे. दैनिक पुढारी वृत्त संस्थेतील खंदा समर्थक आपल्यातून निघून गेला ही बाब सर्वांना चुटपुट करणारी ठरली आहे. सतीश या दिलदार मित्राला पत्रकार बांधवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
*संतोष वळसे पाटील मंचर*.

Previous articleअट्टल खंडणीबहाद्दर हरीश कानसकरसह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल
Next articleरांजणी येथे गॅस सिलेंडरचा साठा जप्त