प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दौंड आगरतर्फे एसटीच्या नवीन फेऱ्या

Ad 1

दिनेश पवार,दौंड

प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दौंड आगारा मध्ये एसटीच्या नव्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत, कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले होते, यामध्ये एसटी बस देखील बंद करण्यात आली होती, लॉक डाऊनमुळे दौंड आगारातील अनेक फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या,परंतु आता शाळा, कॉलेज चालू झाले असल्यामुळे प्रवासी व विद्यार्थी यांच्या मागणीनुसार राज्य परिवहन दौंड आगारातील नवीन फेऱ्या चालू करण्यात आल्या आहेत, इतरही फेऱ्या प्रवासी गर्दी पाहून चालू करण्यात येणार असल्याचे दौंड आगार व्यवस्थापक रामनाथ मगर यांनी सांगितले.

एसटीच्या नवीन फेऱ्या खालील प्रमाणे सुरू करण्यात आल्या आहेत, मार्ग व सुटण्याची वेळ दौंड 8,11:30,12:30 वाजता सिद्धटेक येथून निघण्याची वेळ सकाळी 9:30,दुपारी 12:15,13:30 वाजता, दौंड ते मलठण दरम्यान दौंड येथून सुटण्याची वेळ सकाळी 10,दुपारी 15:15,मलठण येथून निघण्याची वेळ 11:30,16:15,दौंड ते भोळेबावाडी दरम्यान दौंड येथून सुटण्याची वेळ सकाळी 6,11:15 तर भोळेबावाडी येथून निघण्याची वेळ सकाळी 7,दुपारी 12,चौफुला येथे सुटण्याची वेळ वेळ सकाळी 6:45,8,9:30,दुपारी 12,13:30,15,18,19:15 तर बारामती येथून निघण्याची वेळ सकाळी 8,9:30,10:45,दुपारी 13:30,15,16:30,18 वाजता दरम्यान एसटीच्या नव्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत