सुधीर वाळुंज यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

राजगुरूनगर-खेड तालुक्याचे सुपुत्र वाकळवाडी गावचे भुषण सुधीर दिनकरशेठ वाळुंज यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उप निरीक्षक पदी निवड लहानपणापासुनच हुशार,जिद्दी असणारा सुधीर शेतात काम करणे,जनावरे राखणे अशी कामे करत मेहनत व चिकाटीने अभ्यास करून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.

रक्तातच सामाजिक व राजकीय पाश्वभूमी असलेले वडील वाकळवाडी गावचे माजी सरपंच ,चेअरमन तर आई माजी ग्रामपंचायत सदस्य तरी देखील प्रशासनात आधिकारी होण्याचे लहान पणापासुनचे स्वप्न होते. १२ वी मध्ये असताना देखील खेड तालुक्यातून तिसरा येण्याचा मान मिळविला होता.सुधीरने कष्टाच्या जोरावर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास पुण्यात सुरू केला सन २०११ मध्ये पोलिस दलात पोलिस अंमलदार म्हणुन भरती झाले पण आधिकारी होण्याचे स्वप्न स्वस्थ बसु देत नव्हते म्हणून त्यांनी २०१७ मध्ये पुन्हा परिक्षा देऊन पोलिस उप निरीक्षक पदी निवड झाली आणि आधिकारी होण्याचे वाळुंज यांचे स्वप्न साकार झाले.

Previous articleउरुळी कांचन विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी आबासाहेब टिळेकर तर व्हाईस चेअरमनपदी दिगंबर चव्हाण यांची बिनविरोध निवड
Next articleप्रवासी व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दौंड आगरतर्फे एसटीच्या नवीन फेऱ्या