नारायणगाव ते खोडद एस टी बस वेळा पत्रका नुसार सोडत नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिक हैराण

नारायणगाव (किरण वाजगे)

आंतरराष्ट्रीय जागतिक रेडिओ दुर्बीण प्रकल्प असलेल्या खोडद गावामधून नारायणगावात शिकायला येणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वेळेवर येत नसलेल्या एसटी बस अभावी गैरसोय होत आहे.
याबाबत माहिती अशी की, नारायणगाव ते खोडद व पुन्हा नारायणगाव अशी एसटी बस वेळेवर न सोडल्यामुळे हिवरे व खोडद येथील विद्यार्थी व इतर प्रवाशांची गैरसोय होत आहे.

खोडद एस टी बस नारायणगाव आगारातून संबधित वाहतुक नियंत्रक अधिकारी एस टी च्या वेळापत्रकाप्रमाणे सोडत नसल्याने शालेय विदयार्थी, शासकीय निमशासकीय कर्मचारी, महिला, शेतकरी ग्रामस्थ हैराण झाले असून खोडद एस टी बस वेळापञका प्रमाणे सोडण्यात यावी अशी मागणी खोडद ग्रामपंचायत व हिवरे तर्फे नारायणगावचे सामाजिक कार्यकर्ते नितीन खोकराळे यांनी केली आहे.

खोडद एस टी बस दिवाळी भाऊबीजे पासून सुरू झाली आहे. या बसला प्रवाशांचा प्रतिसाद देखील चांगल्या प्रकारे आहे. पण एस टी च्या अधिकार्‍यांच्या ढिसाळ नियोजनामुळे एस टी बस वेळेवर येत नाही.
पुणे येथिल एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी नारायणगाव एस टी आगारातील बस वाहतुकीच्या ढिसाळ नियोजनाची चौकशी करून नागरिकांची व शालेय विदयार्थांची होणारी गैरसोय दुरू करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Previous articleप्रवासी व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दौंड आगरतर्फे एसटीच्या नवीन फेऱ्या
Next articleपेठ ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुरज चौधरी तर उपसरपंचपदी वर्षा चौधरी