निरगुडसर येथून ३३ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता

Ad 1

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

मंचर पोलीस ठाणे हद्दीत निरगुडसर ( कोलतावडे ) ता.आंबेगाव येथील ३३ वर्षीय विवाहित तरुणी करुणा लोहकरे ही घरी गावाला जाते असे सांगून कुठेतरी निघून गेली आहे.तीचा शोध घेतला असता ती सापडली नसल्याने ती बेपत्ता झाली असल्याची तक्रार तिच्या भावाने मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार निरगुडकर कोलतावडे येथील बेपत्ता तरुणी ही विवाहित असून ती आपल्या माहेरी कुटूंबासमवेत निरगुडसर येथे राहते बुधवार दि.२ रोजी दुपारी दिड वाजल्याच्या सुमारास गावाला जाते असे सांगून घरातून गेली होती त्यानंतर सायंकाळी तिच्या भावाने तिच्या मोबाईलवर फोन केला असता तो बंद लागला त्यानंतर तिच्या घरी सासरी फोन केल्याने तिच्या सासर्‍याने ती घरी आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर तिचा सगळीकडे शोध घेतला तसेच नातेवाईक ,व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता ती कोठेही आढळून आली नाही, याबाबत ती बेपत्ता झाली असल्याची फिर्याद तीच्या भावाने मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

  1. बेपत्ता तरुणीचे वर्णन

    करुणा सुरेश लोहकरे (वय ३३) रा.निरगुडसर ता.आंबेगाव जि.पुणे, उंची पाच फूट, रंग सावळा ,अंगाने सडपातळ, केस काळे,असा असून सदर तरुणी कुठे आढळल्यास मंचर पोलिस ठाण्याची संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.