आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथून २० वर्षीय तरुणी बेपत्ता

Ad 1

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

मंचर पोलीस ठाणे हद्दीत जाधववाडी (सुंदरमळा) ता.आंबेगाव येथील २० वर्षीय तरुणी सचिता टेमगिरे ही घरात कुणाला काहीही न सांगता निघून गेली असून तीचा शोध घेतला असता ती सापडली नसल्याने ती बेपत्ता झाली असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार जाधववाडी येथुन बेपत्ता झालेली तरुणी ही आपल्या राहत्या घरी बुधवार दि.४ रोजी घरातील सर्व जण झोपी गेलेले असताना पहाटेच्या सुमारास कुणाला काहीही न सांगता घरातून बाहेर निघून गेली होती पहाटे तिचे वडील उठल्यावर दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी घरात येऊन पाहिले असता सचिता घरात न्हवती बराच वेळ ती घरी न आल्याने तिचा सगळीकडे शोध घेतला तसेच नातेवाईक ,व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता ती कोठेही आढळून आली नाही, याबाबत सचिता बेपत्ता झाली असल्याची फिर्याद तीच्या वडिलांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

बेपत्ता तरुणीचे वर्णन पुढीलप्रमाणे सचिता गुलाब टेमगिरे (वय २० ) रा.जाधववाडी ता. आंबेगाव जि.पुणे, अंगात पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस ,कानात कर्णफुले,पायात सॅडल, असून सदर तरुणी कुठे आढळल्यास मंचर पोलिस ठाण्याची संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.