भिमाशंकर रस्त्यावर बस व कारची समोरासमोर धडक ; चार प्रवासी जखमी

Ad 1

सिताराम काळे

घोडेगाव- भीमाशंकर रस्त्यावरील धाबेवाडी जवळील आबाजी वीर मंदीराच्या वळणावर बस व मोटार गाडी यांची समोरासमोर धडक होवून मोटार गाडीतील चार प्रवासी जखमी झाले असुन त्यांच्यावर घोडेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार चालू आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकरच्या बाजुने महादेवाचे दर्शन घेवून येणारी सॅलोरो मोटार गाडी क्र. एम. एच. १४ एफएक्स ४८६३ व सोनु ट्रॅव्हल्सची बस क्र. युपी ७५ एटी ७७१४ यांची आबाजी वीर मंदीराच्या वळणावर सायं. ६.३० चे दरम्यान समोरासमोर धडक होवून मोटार गाडीतील शांताराम खलाटे (वय-५५), निवृत्ती हारकुल (वय-७७), मंदा हारकुल (वय-७०) व सविता खलाटे (वय-५०) सर्व रा. फुरसुंगी (पुणे) हे प्रवासी जखमी झाले आहेत.

त्यांना घोडेगाव ग्रामीण रूग्णालयामध्ये वैदयकीय अधिकारी डॉ. हेमंत गाढवे, डॉ. राहुल जोशी यांनी उपचार केले. तर शांताराम खलाटे यांचा हात व सविता खलाटे हिचा पाय फॅक्चर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार करत आहे.

Previous articleराष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमीन आरोग्य व्यवस्थापन या योजनेमधून कांदा पीक प्रात्यक्षिक
Next articleमराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॕड.शशिकांत उर्फ आप्पासाहेब पवार यांची दौंड तालुका मराठा महासंघाला सदिच्छा भेट