Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
राजगुरूनगर-राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमीन आरोग्य व्यवस्थापन या योजनेमधून कांदा पीक प्रात्यक्षिक या या विषयावर आज खेड तालुक्यातील बुट्टे वाडी आणि पूर येथे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन घेत असताना घ्यावयाची काळजी तसेच जमीन आरोग्य व्यवस्थापन नुसार कांदा पिका विषयी मार्गदर्शन करण्यात आले .
या कार्यक्रमासाठी खेड तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री वाणी साहेब तसेच आत्मा कृषी तालुका खेड चे तालुका व्यवस्थापक श्री सावंत साहेब आणि कृषी विभागाचे सर्व मंडळातील मंडलाधिकारी ,कृषी पर्यवेक्षक आणि सर्व कृषी सहाय्यक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .
या कार्यक्रमासाठी बुट्टे वाडी आणि पूर या गावातील शेतकरी महिला शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे मृदाशास्त्र विषय तज्ञ श्री योगेश यादव यांनी जमीन आरोग्य व्यवस्थापन व कांदा पिकाचे उत्तम उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने काय करणे गरजेचे आहे तसेच आपले उत्पादन दुप्पट करण्याच्या दृष्टीने उत्तम बियाणे जमीन आरोग्य व्यवस्थापन करताना माती परीक्षण करणे गरजेचे आहे तसेच कीड व रोग याविषयी मार्गदर्शन करताना कीड रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन फवारणी किंवा कीड रोग नियंत्रण करणे गरजेचे आहे तसेच आपण उत्पादित केलेला माल प्रति वारी करून विकणे कशाप्रकारे फायद्याचे होऊ शकते याचे मार्गदर्शन केले. श्री सावंत यांनी आत्मा योजनेची माहिती देऊन विकेल ते पिकेल, रयत बाजार अभियान, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन या योजनांची माहिती दिली
Download WordPress Themes Nulled and plugins.