मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॕड.शशिकांत उर्फ आप्पासाहेब पवार यांची दौंड तालुका मराठा महासंघाला सदिच्छा भेट

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॕड.शशिकांत पवार यांनी अ.भा.मराठा महासंघ दौंड तालुका पदाधिकारींना सदिच्छा भेट दिली. सदर कार्यक्रम शिवाई प्युअर व्हेज कासुर्डी फाटा येथे झाला. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस व मराठा आरक्षणाचे अभ्यासक राजेंद्र कोंढरे, प्रदेशाध्यक्ष संतोष नानवटे, पुण्याचे उद्योजक बाळासाहेब आमराळे पाटील उपस्थित होते. दौंड तालुका मराठा महासंघाच्या वतिने राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांचा फोटोफ्रेम व पुस्तक देवून सन्मान करण्यात आला.

यावेळी आप्पासाहेबांनी व कोंढरे उपस्थित सर्व पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले. उपस्थिती मध्ये अ.भा.युवक मराठा महासंघ पुणे जिल्हा सचिव मयुर सोळसकर, दौंड तालुका संपर्कप्रमुख संतोष आखाडे, युवक उपाध्यक्ष विशाल राजवडे, वकील आघाडी अध्यक्ष अॕड.अजित दोरगे, विद्यार्थी आघाडी माजी अध्यक्ष सुरज चोरगे, विद्यार्थी उपाध्यक्ष समीर लोहकरे, युवक कार्याध्यक्ष अतुल आखाडे, सचिव श्रीकांत जाधव, संघटक विकास टेमगिरे, यवत शाखा अध्यक्ष सुरज मलभारे आदि युवक उपस्थित होते.