चिंचवड देवस्थानच्या वतीने श्रीरामजन्मभूमी मंदिरासाठी २१ लाखांचा धनादेश

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

अयोध्या येथे नियोजित श्रीरामजन्म भूमी मंदिर उभारणीचे काम प्रत्यक्षात सुरु झाले आहे. हे पूर्णपणे जनतेच्या आर्थिक सहभागातूनच उभे राहणार असून यामध्ये आपलाही सहभाग असावा प्रत्येकाची इच्छा आहे.

मंदिर उभारणीसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट, चिंचवड – पुणे यांच्या नेतृत्वाखाली मोरगाव, थेऊर सिद्धटेक ,चिंचवड यांच्या माध्यमातून २१ लक्ष रुपयांचा धनादेश श्री राम मंदिराचे मुख्य विश्वस्त स्वामी गोविंददेव गिरीमहाराज यांच्याकडे देण्यात आला.
यावेळी मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्राम देव, ह.भ.प.आनंद महाराज तांबे, राजेंद्र उमाप, विनोद पवार आदी उपस्थित होते.