जिल्हा परीषद शाळांना एक कोटी ब्याऐंशी लाख अनुदान मंजुर

सिताराम काळे

– पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांना सन २०२०-२१ साठी चार टक्के सादिल अंतर्गत एक कोटी ब्याऐंषी लाख एक हजार तिनशे चव्वेचाळीस रूपयांचा निधी उपलब्ध झाला असुन संबंधित रक्कम पुणे जिल्हयातील तेरा तालुक्यांना देण्यात आली आहे.

शालेय शिक्षण विभाग ४ जुन २०२० अन्वये सादिल अनुदानाची रक्कम व महाराष्ट्र शासन उदयोग विभागाच्या शासन निर्णय १ डिसेंबर २०१६ मधील विहित पध्दतीचा अवलंब करून खर्च करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये शाळा इमारत व स्वच्छतागृह देखभाल व दुरूस्ती. वैयक्तिक स्वच्छतेसाठी लागणारी आवश्यक सामुग्री. इंटरनेट जोडणी व देयके. विविध डिजीटल, संगणक साहित्य आणि त्यासोबतची उपकरणे यांची देखभाल, दुरूस्ती. पिण्याची पाण्याची व्यवस्थेची देखभाल, दुरूस्ती. स्टेशनरी, विविध प्रकारचे रजिस्टर्स यांची खरेदी. अग्निप्रतिबंधक यंत्रांची पुनर्भरणी. प्रथमोपचार पेटी. विज बिल या बाबींवर खर्च करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

तालुकानिहाय मंजुर सादिल अनुदानामध्ये आंबेगाव तालुक्यासाठी १० लाख ८८ हजार १९२ रूपये. बारामतीसाठी १२ लाख ३८ हजार ७२० रूपये. भोर १० लाख ९७ हजार ६०० रूपये. दौंड १४ लाख ९२ हजार ७३६ रूपये. हवेली १७ लाख ७९ हजार ६८० रूपये. इंदापुर १५ लाख ४४ हजार ४८० रूपये. जुन्नर १५ लाख ९४ हजार ६५६ रूपये. खेड २३ लाख ४ हजार ९६० रूपये. मावळ १४ लाख ९५ हजार ८७२ रूपये. मुळशी ११ लाख ४४ हजार ६४० रूपये. पुरंदर ९ लाख २० हजार ४१६ रूपये. शिरूर १९ लाख ८३ हजार ५२० रूपये व बेल्हा तालुक्यासाठी ५ लाख १५ हजार ८७२ रूपये असे एकंदरीत एक कोटी ब्याऐंशी लाख एक हजार तिनशे चव्वेचाळीस रूपयांचा निधी मंजुर झाला आहे.
सन २०१०-११ पर्यंत शाळांना सादिल अनुदान मिळत होते. २०११-१२ पासुन हे अनुदान बंद झाले होते. जिल्हा परीषद शाळांना सादिल अनुदान मिळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा चालू होता. सन २०२०-२१ साठी सादिल अनुदान मंजुर झाल्याने शालोपयोगी साहित्य घेण्यास निश्चितच मदत होणार आहे. यापुढे हे अनुदान दरवर्षी नियमितपणे दयावे, अशी मागणी पुणे जिल्हा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वाळुंज यांनी केली.

Previous articleआंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात तलाठी आपल्या सजामध्ये न थांबल्यास आंदोलन करण्याचा किसान सभेचा इशारा
Next articleचिंचवड देवस्थानच्या वतीने श्रीरामजन्मभूमी मंदिरासाठी २१ लाखांचा धनादेश